Degree
Degree Sakal
एज्युकेशन जॉब्स

करिअर घडविताना : शॉर्ट & स्वीट

सकाळ वृत्तसेवा

करिअरची निवड करताना थोडा वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे. अनेक क्षेत्रांत उत्तमोत्तम संधी आहेत. त्याकडे डोळसपणे पाहण्याची आवश्यकता आहे.

- राजेश ओहोळ

करिअरची निवड करताना थोडा वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे. अनेक क्षेत्रांत उत्तमोत्तम संधी आहेत. त्याकडे डोळसपणे पाहण्याची आवश्यकता आहे. आपल्या आवडीचाही कदाचित या वेगळ्या करिअर ऑप्शनमध्ये विचार होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे आवडीचे शिक्षण घेतल्याने करिअरसाठीही कोणतीही अडचण येणार नाही.

कॉम्प्युटर हार्डवेअर/नेटवर्किंग

  • शिक्षणाचा स्तर : सर्टिफिकेट/डिप्लोमा

  • आवश्यक शैक्षणिक पात्रता : किमान दहावी

  • कालावधी : तीन महिने

  • संधी कोठे? : कॉम्प्युटर टेक्निशियन म्हणून खासगी/सरकारी नोकरी, तसेच स्वयंरोजगाराच्या संधी, तसेच सदर शिक्षणाने पदवीनंतर आयटीत नोकरी संधी.

  • पुढील उच्च शिक्षण : बारावीनंतर बीएस्सी/बीसीए व त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण अथवा अभियांत्रिकी पदविका/पदवी शिक्षण

टेलि सॉफ्टवेअर

  • सर्टिफिकेट

  • किमान बारावी कॉमर्स व मूलभूत कॉम्प्युटरचे ज्ञान

  • तीन ते सहा महिने

  • कॉमर्स शिक्षणधारकांना अकाउंटिंग क्षेत्रात या सॉफ्टवेअरची उपयुक्तता भासते.

  • एम. कॉम., सी.ए. सी. एस., आय. सी. डब्लू. ए. आदी शिक्षण

ग्राफिक डिझाइनिंग/अॅनिमेशन/वेब डिझाइनिंग

  • सर्टिफिकेट/डिप्लोमा - दहावी/बारावी

  • २ ते १२ महिने

  • ग्राफिक डिझाइनिंग/अॅनिमेशन क्षेत्रात नोकरी अथवा स्वयंरोजगार जाहिरात उद्योग व फिल्म इंडस्ट्रीमध्ये विपुल संधी.

  • पदवी/पदव्युत्तर शिक्षण घेऊन शैक्षणिक पात्रता वाढविता येते.

मर्चंट नेव्ही

  • पदवी - बारावी (शास्त्र)

  • चार वर्षे

  • मर्चंट नेव्हीत नोकरी

  • एम. टेक./एम. ई.

एरोस्पेस इंजिनिअरिंग

  • पदवी - बारावी (शास्त्र) (५५ टक्क्यांनी उत्तीर्ण)

  • चार वर्षे

  • एव्हिएशन इंडस्ट्री, एअर लाइन्स संशोधन व विकास संस्था, संरक्षण, अंतरिक्ष क्षेत्रामध्ये नोकरी

  • एम. टेक./पीएच.डी.

अभिनय, सिनेमॅटोग्राफी संपादन (एडिटिंग), साउंड रेकॉर्डिंग अॅण्ड कॉम्प्युटर ग्राफिक्स फीचर फिल्म अॅण्ड स्क्रीन प्ले रायटिंग

  • सर्टिफिकेट/डिप्लोमा

  • १ ते ३ वर्षे

  • चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी क्षेत्रात करिअर

कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम

  • डिप्लोमा

  • पदवी

  • दोन वर्षे

  • प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये नोकरी

  • कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझममधील पदव्युत्तर शिक्षण/पीएच.डी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: लाल किल्ल्यावरून सांगतो त्यांची प्रतिष्ठा वाढलीच पाहिजे.. अदानी अंबानीवर विचारलेल्या प्रश्नावर मोदींचे छातीठोक उत्तर

Chandu Champion : प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर; चित्रपटातील 'त्या' सीनचं सिक्रेट कार्तिकने केलं उघड

Instagram Post Delete : इंस्टाग्रामच्या पोस्ट एकावेळेस एका क्लिकमध्ये डिलीट करायच्या आहेत? फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

Sangli Crime : गुंगीचे औषध देऊन कॅफेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 'शिवप्रतिष्ठान'कडून कॅफेची तोडफोड

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन छगन भुजबळ यांच्या भेटीला भुजबळ फॉर्मवर दाखल

SCROLL FOR NEXT