RBI Sakal
एज्युकेशन जॉब्स

RBI मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची भरती! 15 जानेवारीपासून करा अर्ज

रिझर्व्ह बॅंकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची भरती! 15 जानेवारीपासून करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियामध्ये (RBI) सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी गुड न्यूज!

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank of India - RBI) सरकारी नोकरी (Government Jobs) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी गुड न्यूज! रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड (Reserve Bank of India Services Board - RBISB) ने भारतीय रिझर्व्ह बॅंकेसाठी विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बॅंकेने जारी केलेल्या जाहिरातीनुसार पॅनेल वर्ष 2021 साठी कायदा अधिकारी ग्रेड 'B', व्यवस्थापक (तांत्रिक- सिव्हिल), व्यवस्थापक (तांत्रिक- इलेक्‍ट्रिकल), लायब्ररी प्रोफेशनल (सहाय्यक ग्रंथपाल) ग्रेड A, वास्तुकार ग्रेड 'A' या पदांसाठी पूर्णवेळ करारावर एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. (RBI announces recruitment of Specialist Officer Posts)

जरी, SO भरतीसाठी तपशीलवार अधिसूचना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने अद्याप जारी केलेली नाही, परंतु RBI SO भरती 2022 जाहिरातीनुसार, अर्ज करू इच्छिणारे उमेदवार बॅंकेच्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in च्या करिअर विभागातून किंवा रोजगार समाचारमध्ये 15 ते 21 जानेवारी 2022 दरम्यान प्रकाशित होणाऱ्या जाहिरातीमधून अधिक माहिती मिळवू शकतील.

15 जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया

इच्छुक उमेदवार आरबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रिया 15 जानेवारी 2022 पासून सुरू होईल आणि उमेदवार 4 फेब्रुवारी 2022 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकतील. RBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर उमेदवारांना करिअर विभागात जावे लागेल. यानंतर 15 जानेवारी 2022 तारखेसह उपलब्ध करून देण्यासाठी 'Apply Online' लिंकवर क्‍लिक करा. अर्जाच्या पेजवर उमेदवारांना विचारलेले तपशील भरून नोंदणी करावी लागेल. यानंतर उमेदवार नोंदणी क्रमांक किंवा जारी केलेल्या युजर नेम आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करून अर्ज सबमिट करण्यास सक्षम असतील.

6 मार्च रोजी लेखी परीक्षा

उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे, की RBI ने या भरतीसाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केलेली नसली तरी, बॅंकेने विहित केलेल्या निवड प्रक्रियेनुसार पहिल्या टप्प्यात घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन/ लेखी परीक्षेची तारीख फक्त छोट्या जाहिरातीमध्ये जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार 6 मार्च 2022 रोजी लेखी परीक्षा (Written Exam) होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dress Code: कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड सक्तीचा; राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या कपड्यांवर बंदी? जाणून घ्या...

Mumbai News: मुंबईकरांना मोठा दिलासा! मढ ते वर्सोवा अवघ्या १० मिनिटांत पोहोचणार; केबल पूल लवकरच सुरु होणार

Nashik Municipal Election : निवडणुकीपूर्वीच उमेदवारांना महागाईचा झटका! चहा-नाश्त्यापासून बॅनरपर्यंतचे नवीन दर जाहीर

Kagal Accident : महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने कार, दोन बैलगाड्या आणि मोटरसायकल चिरडल्या...

Ichalkaranji Municipal : इचलकरंजीच्या राजकारणात मोठा बदल; महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘हात’ चिन्ह गायब

SCROLL FOR NEXT