Jobs : मेट्रोमध्ये सहाय्यक व्यवस्थापक, अभियंता अन्‌ इतर पदांची बंपर भरती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रोमध्ये सहाय्यक व्यवस्थापक, अभियंता अन्‌ इतर पदांची बंपर भरती!
मेट्रोमध्ये सहाय्यक व्यवस्थापक, अभियंता अन्‌ इतर पदांची बंपर भरती!

मेट्रोमध्ये सहाय्यक व्यवस्थापक, अभियंता अन्‌ इतर पदांची बंपर भरती!

गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (Gujarat Metro Rail Corporation, GMRC) व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, अभियंता आणि इतर पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट @gujaratmetrorail.com वर जाऊन अधिसूचना पाहू शकतात. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे, की या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी 2022 आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. (Bumper recruitment of Assistant Manager, Engineer and other posts in Gujarat Metro)

हेही वाचा: फिजिक्‍स, मॅथ्समधून 12वी पास आहात, तर 'येथे' आहे सरकारी नोकरीची संधी

रिक्त जागांचा तपशील

  • वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक सिव्हिल : 04

  • उपमहाव्यवस्थापक सिव्हिल : 04

  • व्यवस्थापक : 17

  • असिस्टंट मॅनेजर सिव्हिल : 06 पदे

  • महाव्यवस्थापक : 02 पदे

  • जनरल मॅनेजर इलेक्‍ट्रिकल : 01 पद

  • जनरल मॅनेजर ट्रॅक्‍शन : 02 पदे

शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे BE, B.Tech पदवी असावी. यासोबतच डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे BE / BTech पदवी असावी. याशिवाय व्यवस्थापक पदासाठी उमेदवारांकडे BE, B.Tech पदवी असावी. यासोबतच उमेदवारांना 9 वर्षांचा अनुभव असावा. तर अभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे बीई, बीटेक पदवी असणे आवश्‍यक आहे. याशिवाय, अर्जदारांना तीन वर्षांचा अनुभव असावा.

हेही वाचा: बॅंक ऑफ बडोदामध्ये निघाली 198 पदांची आणखी एक भरती!

असा करा ऑनलाइन अर्ज

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि इतर पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट www.gujaratmetrorail.com/careers/ ला भेट देऊन लॉग इन करावे लागेल. यानंतर अधिसूचना पूर्णपणे वाचल्यानंतर, तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्जदारांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, की अर्ज करताना फॉर्म नीट वाचावा, कारण अर्जामध्ये काही तफावत आढळल्यास अर्ज नाकारला जाईल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top