Jobs : फिजिक्‍स, मॅथ्समधून बारावी पास आहात, तर तुमच्यासाठी 'येथे' आहे सरकारी नोकरीची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फिजिक्‍स, मॅथ्समधून बारावी पास आहात, तर तुमच्यासाठी 'येथे' आहे सरकारी नोकरीची संधी
फिजिक्‍स, मॅथ्समधून बारावी पास आहात, तर तुमच्यासाठी 'येथे' आहे सरकारी नोकरीची संधी

फिजिक्‍स, मॅथ्समधून 12वी पास आहात, तर 'येथे' आहे सरकारी नोकरीची संधी

उत्तराखंड सबऑर्डिनेट सिलेक्‍शन कमिशनने (Uttarakhand Subordinate Selection Commission - UKSSSC) चीफ कॉन्स्टेबल (Chief Constable) पदाच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. पोलिस दूरसंचार विभागाच्या (Police Telecom Department) अंतर्गत उत्तराखंड अधीनस्थ निवड आयोगाकडून या नियुक्‍त्या केल्या जातील. याअंतर्गत एकूण 272 पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार sssc.uk.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी 10 जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी 2022 आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या पदासाठीची परीक्षा जुलै 2022 मध्ये घेतली जाईल. (Candidates who have passed twelfth from Physics, Maths have the opportunity of government job)

हेही वाचा: बॅंक ऑफ बडोदामध्ये निघाली 198 पदांची आणखी एक भरती!

चीफ कॉन्स्टेबल पदाकरिता या स्टेपनुसार करा अर्ज

चीफ कॉन्स्टेबलच्या पदासाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट म्हणजे sssc.uk.gov.in ला भेट द्यावी. त्यानंतर रिक्त जागेसाठी 'अर्ज करा' वर क्‍लिक करा. आता नोंदणी लिंकवर क्‍लिक करा. तुमचे तपशील भरा, दस्तऐवज अपलोड करा आणि पुनरावलोकन करा. एकदा नोंदणी करा, लॉग इन करा, अर्ज भरा आणि सबमिट करा. उमेदवार अर्जाची प्रिंटआउट घेऊन भविष्यातील संदर्भासाठी जतन करू शकतात.

हेही वाचा: आधार क्रमांकाद्वारे कोणी तुमच्या बॅंक बॅलन्सवर डल्ला मारू शकेल?

शैक्षणिक पात्रता

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, चीफ कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारे उमेदवार भौतिकशास्त्र (Physics), गणित (Mathematics) आणि इंग्रजी (English) विषयांसह बारावी उत्तीर्ण असावेत. शैक्षणिक (Education) पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. उमेदवारांच्या वयोमर्यादेशी संबंधित माहिती देखील अधिसूचनामध्ये तपासू शकता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top