10th SSC Board Exam :
10th SSC Board Exam : sakal
एज्युकेशन जॉब्स

Maharashtra SSC Board Exam 2024 : ऑल द बेस्ट! आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (ता. १) सुरू होत आहे. परीक्षेसाठी २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधील १६ लाख नऊ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ‘‘विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तणावमुक्त वातावरणात ही परीक्षा द्यावी,’’ असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ३२ हजार १८९ ने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यंदा खासगी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. राज्य मंडळाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या वेळी मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिकराव बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. मार्च २०२४ च्या परीक्षेसाठी पेपरच्या नियोजित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत.

पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्‍न

पुणे ; दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी, प्रश्‍नपत्रिकेची गोपनीयता राखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर कधीपर्यंत हजर राहावे, यासंदर्भातील पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्‍नांची उत्तरे राज्य मंडळातर्फे देण्यात आली आहेत.

१) प्रश्‍नपत्रिकेची गोपनीयता राखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?

परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परीरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत असतील. त्यांनी परीरक्षण केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोचेपर्यंत आणि वितरित करेपर्यंत मोबाईलमध्ये चित्रीकरण करतील. प्रश्‍नपत्रिकेची गोपनीयता राखण्यासाठी परीरक्षक यांची ‘जीपीएस’ प्रणाली सुरू असणार आहे.

२) परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी कधीपर्यंत उपस्थित राहावे?

परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचावे. सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षार्थींनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे.

३) वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा देऊ न शकल्यास काय करावे?

अशा विद्यार्थ्यांना २७ ते ३० मार्च या कालावधीत ‘आउट ऑफ टर्न’ आयोजित केली आहे.

नोंदणी केलेले विद्यार्थी : ८,५९,४७८

विद्यार्थी : ७,४९,९११

विद्यार्थिनी : ५६

तृतीयपंथी :

एकूण : १६,०९,४४५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

SCROLL FOR NEXT