Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

Porsche Crash Case: अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक केल्यानंतर पुणे पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे.
Porsche Crash Case
Porsche Crash CaseEsakal

Porsche Crash Case: पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीत अनेक खुलासे समोर आले आहेत. रक्ताचा नमुना बदलण्याची कल्पना त्यांना डॉक्टरांनी दिली होती, अशी माहिती तिने यावेळी दिली आहे. अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात रोज नवी माहिती समोर येत आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक केल्यानंतर पुणे पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला त्याच्या आईसोबत सुधारगृहात बसवून चौकशीही करण्यात आली आहे.

ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांच्या वक्तव्यानंतर या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप असलेले डॉ. तावरे यांना यापूर्वीच्या काही प्रकरणांमध्ये आरोपी असतानाही मंत्री आणि आमदाराच्या शिफारशीवरून फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख बनवण्यात आले होते.

रोज नवे खुलासे

पोलिसांनी शनिवारी अल्पवयीन आरोपीच्या 49 वर्षीय आईला अटक केली. याआधी त्याचे वडील आणि आजोबा यांनाही अटक करण्यात आली होती. आरोपीच्या आईवर तिच्या 17 वर्षांच्या मुलाच्या रक्ताचा नमुना तिच्या स्वत: च्या रक्ताचा नमुना बदलण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे.

Porsche Crash Case
Pune Porsche Accident: "मी नशेत होतो, मला काहीच आठवत नाही," पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीने पुणे पोलिसांनना काय काय सांगितले?

ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांच्या वक्तव्यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. विनायक काळे म्हणाले की, यापूर्वीच्या काही प्रकरणांमध्ये आरोपी असतानाही डॉ. तावरे यांना मंत्री आणि आमदाराच्या शिफारशीवरून फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख बनवण्यात आले होते.

रक्ताचा नमुना घेण्याच्या दोन तास अगोदर डॉक्टर अजय तवरे यांनी अल्पवयीन मुलाच्या वडिलांशी 14 वेळा फोनवर बोलल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी पुणे पोलिस सातत्याने नवनवीन खुलासे करत आहेत. दोन्ही डॉक्टरांना अटक केल्यानंतर आता डॉ. तावरे तसेच अपघातग्रस्त वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर आणि रुग्णालयाच्या शवागारात काम करणारे अतुल घाटकांबळे यांच्या घराचीही झडती घेण्यात आली. पोलिसांनी डॉ हळनोर यांच्याकडून अडीच लाख रुपये आणि घाटकांबळे यांच्याकडून 50 हजार रुपये जप्त केले आहेत.

Porsche Crash Case
Pune Porsche Accident : रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अग्रवाल पती-पत्नीस ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com