Fashion Design
Fashion Design Sakal
एज्युकेशन जॉब्स

अपडेट : फॅशन डिझाईनच्या क्षेत्रातील ग्लॅमर

सकाळ वृत्तसेवा

भारतीय फॅशनमध्ये हजारो वर्षांचा पारंपारिक इतिहास आहे. प्रत्येक भागामध्ये विविध प्रकारचे पारंपारिक कपडे आणि वेगळ्या पद्धती आहेत.

- विद्यावाचस्पती विद्यानंद

भारतीय फॅशनमध्ये हजारो वर्षांचा पारंपारिक इतिहास आहे. प्रत्येक भागामध्ये विविध प्रकारचे पारंपारिक कपडे आणि वेगळ्या पद्धती आहेत. सद्य:स्थितीत आधुनिक फॅशन उद्योग जगत सर्वत्र वेगाने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय विकासाशी फॅशन उद्योग संबंधित आहे. फॅशन डिझाईनिंग हे दर्जेदार शिक्षण निवडून आपण आपल्या उत्कटतेस समृद्ध कारकिर्दीत रूपांतर करू शकता. दूरदृष्टी असण्याव्यतिरिक्त, फॅशन डिझायनर बनण्यासाठी फॅशन इच्छुकांकडे आवश्यक इतरही कौशल्ये लागतात. फॅशन करण्याच्या कलांचे महत्त्वपूर्ण कौशल्य अंगी असणं आवश्यक असतं.

आवश्यक कौशल्ये...

  • व्यवसाय बांधणी - आपल्या संभाव्य निर्णयांचे मूल्य आणि लाभांची गणना करण्यासाठी आपल्यात उत्कृष्ट व्यवसाय कौशल्ये असावे.

  • संवाद - चांगले संभाषण कौशल्य तुमचा आत्मविश्वास वाढवते आणि अपेक्षित अंतिम परिणामासाठी ते मदत करते.

  • स्पर्धात्मकता - जागतिक स्तरावर फॅशन उद्योग सतत विकसित होत आहे, त्यास त्याच्या व्यावसायिकांसह उत्क्रांत होणं आवश्यक असतं. हे आपल्याला जागतिक आव्हानं आणि स्पर्धा यासाठी खुलं असणं आवश्यक असतं. डिझायनर म्हणून आपल्यात स्पर्धात्मकतेची भावना असावी.

  • सर्जनशीलता आणि निरीक्षण - आपण चालवत असलेल्या उद्योगांच्या प्रवाहातील निरीक्षक असणं आणि आपल्या डिझाईनमध्ये नाविण्यपुर्णता आणणं आवश्यक असतं. जगभरांतील डिझाइनरकडून अनेक व्यावसायिक बाबी जाणून घ्याव्यात. त्यांच्या व्यवसायाचं वेगळेपण, त्यांची पार्श्वभूमी, त्यांची डिझाईन शैली, त्यांनी शिक्षण घेतलेली संस्था, त्यांची विविध कौशल्य अशा अनेक बाबींचा विश्लेषणात्मक अभ्यास करणं उपयुक्त ठरत असतं.

  • रेखांकन - कागदावर आपले डिझाइन किंवा विचार सादर करता यावं. स्टोरीबोर्ड आणि उत्पादन श्रेणी कशी तयार करावी? ते जाणून घ्यावं. सामग्रीचा स्रोत/उपलब्धता कुठे आणि कशी आहे? हे माहीत करून घेणं महत्त्वाचं असतं. सर्व प्रकारच्या कापडांचा वापर करून शिवणकाम करण्यासाठी त्याचं यांत्रिक कौशल्य अवगत करून घेणं जरुरीचं असतं.

साहित्य आणि रंगांच्या निवडीसाठी दृष्टिकोन चांगला असावा. फॅशन डिझाइन करिअरची सुरुवात करण्यासाठी प्रत्यक्ष कार्याचा अनुभव घेणं हा महत्त्वाचा टप्पा आहे. अनुभवी फॅशन डिझायनरकडून शिकण्याची संधी मिळण्यासाठी अपरेंटिसिपीस आणि इंटर्नशिपमध्ये अनेक कौशल्य विकसित करता येतात. पुरुष आणि महिला दोन्ही फॅशन आणि डिझायनर कपडे परिधान करणं पसंत करत आहेत. त्यामुळे अनेक नवीन संस्था उदयास आल्या आहेत. त्या ठिकाणी फॅब्रिक आणि पोशाख डिझाइन आणि तंत्रज्ञानातील प्रतिभा आणि सर्जनशीलता वाढविण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना शिकवलं जातं.

रोजगाराच्या संधी

अभ्यासक्रमाचा भाग म्हणून, फॅशन डिझायनिंग विद्यार्थ्यांना मोठ्या ब्रॅण्ड अंतर्गत काम करण्यास सांगितले जाते आणि फॅशनच्या मूलभूत गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि स्वत:च्या संकल्पनेनुसार फॅशनच्या वस्तू विकसित करण्यासाठी डिझाइनर्सना साहाय्य केले जाते. ते करिअरचे अनेक मार्ग खुले करते. फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना वेशभूषा डिझायनर, मर्कंटायझर, शिक्षण, टेक्स्टाईल उत्पादन, फॅशन प्रकाशक, फॅशन प्रोग्रॅम उत्पादक, चित्रपट निर्मिती विभाग, फॅशन डिझायनर, फॅशन स्टायलिस्ट, स्टोअर व्यवस्थापक, फॅशन सल्लागार, व्हिज्युअल मर्चंडाइझर, उत्पादन व्यवस्थापक, गुणवत्ता नियंत्रक, फॅशन छायाचित्रकार इत्यादी अनेक क्षेत्रांत कामाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

भारतीय फॅशन रिटेल बाजार खूप मोठा आहे. अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय उद्योजक तयार वस्त्र निर्मितीच्या क्षेत्राच्या विकासास हातभार लावत आहेत. फॅशन डिझाईन कारकिर्दीला सुरुवात करण्यासाठी कठोर परिश्रम आणि चिकाटी आवश्यक असते. फॅशन डिझाईन करियरची तयारी करताना, आपले सर्वोत्कृष्ट काम दर्शविण्याचा प्रारंभ करणे महत्त्वाचं असतं. तुम्ही फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रांत पदार्पण करत असताना तुमचे पोर्टफोलिओ तुमच्या कौशल्यपूर्ण कामाची ओळख सांगत असतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतः विषयीचे तसेच तुम्ही करू शकत असलेल्या कामाबद्दलची सविस्तर माहिती सांगू शकणारे नावीन्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करून घेणं उपयुक्त ठरतं.

(लेखक करिअर, मानसशास्त्रीय समुपदेशक आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar Constituency Lok Sabha Election Result: ना जलील ना खैरे ऑन्ली भूमरे, वादांच्या भोवऱ्यात अडकूनही शिंदे गटाने मिळवला मोठा विजय

Satara Lok Sabha Result: तुतारीसारख्या दिसणाऱ्या चिन्हाने शशिकांत शिंदेचा केला घात...साताऱ्यात नेमकं काय घडलं?

Social Media Reaction: निवडणुकीच्या निकालांमुळे शेअर बाजार कोसळला; सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस

India Lok Sabha Election Results Live : गुजरातच्या बालेकिल्ल्याला काँग्रेसने पाडले भगदाड! भाजपच्या क्लीनस्वीपच्या स्वप्नाला कोणी फेरले पाणी? 

Maharashtra Lok Sabha Election Results Live : बीडमध्ये पंकजा मुंडे विजयाच्या दिशेने, तब्बल ७५ हजार मतांचं लीड

SCROLL FOR NEXT