Tea sakal
फूड

सकाळी चहासोबत 'या' पदार्थांचे सेवन चुकूनही करू नका, लठ्ठपणा वाढेल

जर तुम्हीही चहासोबत अशा पदार्थांचे सेवन करत असाल, ज्यामुळे वजन वाढते, तर तुमची हि सवय लवकर बदला.

सकाळ डिजिटल टीम

सकाळचा चहा हा प्रत्येकाच्या सवयीचा भाग बनलेला आहे. सकाळच्या चहाने दिवसाची सुरवात केली तर दिवस ताजेतवाणा जातो, असा कित्येकांचा समज आहे. अनेकदा चहासोबत सकाळी नाश्ता म्हणून विविध पदार्थांचे सेवन केले जाते, जे कित्येकदा शरीरावरील चरबी वाढवण्याचे काम करतात. जर तुम्हीही चहासोबत अशा पदार्थांचे सेवन करत असाल, ज्यामुळे वजन वाढते, तर तुमची हि सवय लवकर बदला.

चहासोबत खालील पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते. जाणून घ्या.

बिस्कीटे

अनेकदा लोक चहासोबत बिस्किटे खातात. दिवसभर भूक लागू नये म्हणून लोक चहासोबत बिस्किटे खातात परंतु तुम्हाला माहित आहे का यामुळे तुमच्या पोटाची चरबी खूप वेगाने वाढते, त्यामुळे सकाळी बिस्किटे खाण्यास टाळा.

नमकीन

तुम्हालाही चहासोबत नमकीन खायला आवडतात का? नमकीन तळलेली असते. त्यात भरपूर फॅट असते. चहासोबत नमकीन खाल्ल्याने पोटाची चरबी झपाट्याने वाढू लागते. त्यामुळे सकाळी चहासोबत नमकीन खाणे, टाळा.

भात

बहुतेक लोकांना सकाळी चहासोबत फ्राय केलेला किंवा भात खाणे आवडते, पण त्यामुळे पोटाची चरबी झपाट्याने वाढते. जर तुमचे वजन झपाट्याने वाढत असेल तर तुम्ही ताबडतोब सकाळी चहासोबत भात खाणे बंद केले पाहिजे. जर तुम्हाला भात खावासा वाटत असेल तर तुम्ही ब्राऊन राईस किंवा राईसमध्ये भरपूर भाज्या घालून खाऊ शकता, परंतु हे आठवड्यातून एकदाच करा.

नूडल्स

नूडल्स खायला खूप चविष्ट असतात, पण तो आरोग्यदायी नाश्ता नाही. त्यामुळे न्याहारीमध्ये किंवा चहासोबत नूडल्सचे सेवन कधीही करू नये. त्यामुळे लठ्ठपणा वेगाने वाढतो.

पकोडे

लोकांना चहासोबत पकोडे खायला आवडतात, पण सकाळी तळलेले पदार्थ खाणे अजिबात योग्य नाही. सकाळी तळलेले पदार्थ खाऊ नका,जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT