Pune Weekend Treat esakal
फूड

Pune Weekend Treat : पदार्थ दिसतात खरे नॉन व्हेज सारखे पण आहेत प्यूअर व्हेज! फूडी लोकांसाठी परफेक्ट वीकेंड ट्रीट

नॉन व्हेज पदार्थांची एक गंमत म्हणजे त्यांच्यात वापरलेले मसाले

सकाळ डिजिटल टीम

Pune Weekend Treat : नॉन व्हेज पदार्थांची एक गंमत म्हणजे त्यांच्यात वापरलेले मसाले, कित्येक बायका घरात नॉन व्हेज मसालेही घेऊन येतात आणि आपल्या रेग्युलर भाजींमध्ये वापरतात, अर्थात त्याची चव खूप चांगली असते. पण नॉन व्हेज सगळेच खात नाही; काही लोकं प्यूअर व्हेज असतात.

आपल्या आजूबाजूलाही असे लोकं आपण बघत असू जे नॉन व्हेज खात नाही आणि त्यांना त्यांचे मित्र यावरून चिडवत असतात, पण आता हे चिडवणं बंद होऊ शकतं. पुण्यात असं एक भन्नाट रेस्ट्राॅरंट उघडलं आहे जिथे तुम्ही सगळे नॉन व्हेज सारखे दिसणारे पदार्थ खाऊ शकतात कारण ते प्यूअर व्हेज आहेत. इथली खाशियात अशी आहे की, इथले पदार्थ दिसायला नॉन व्हेज सारखे दिसतील याची खात्री घेतलेली आहे, पण ते खरंतर प्यूअर व्हेज आहेत.

नक्की कुठे आहे हे रेस्ट्राॅरंट

रंगीन असं या रेस्ट्राॅरंटच नाव असून हे गोखलेनगर, एस. बी. रोड, पुणे इथे आहे. रेग्युलर रेस्ट्राॅरंट सारखं रेस्ट्राॅरंट असलं तरी सर्व्ह करणाऱ्या तब्बल 450 हूनही जास्त प्यूअर व्हेज पण तरीही अगदी हुबेहूब नॉन व्हेज सारख्या दिसणाऱ्या डिशेज मुळे लोकांसाठी वेगळंच आकर्षण बनल आहे.

अनलिमिटेड ब्रेकफास्टची सोय

जर तुम्ही इथे सकाळी 7 ते 12 मध्ये आलात तर तुम्ही इथे अनलिमिटेड ब्रेकफास्ट खाऊ शकतात, आणि तेही फक्त 135 रुपयांमध्ये.

बॉलीवुड थीम

या रेस्ट्राॅरंटच पूर्ण इंटिरियर बॉलीवूड थीमने पेंट केलेलं आहे, त्यामुळे इथे तुम्हाला अनेक जुन्या आणि हिट चित्रपटांचे सीन रंगवलेले दिसतील. आणि तुम्ही आपल्या आवडत्या चित्रपटाच्या सीनसोबत बसून आपलं फूड एंजॉय करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebola Cases: कोरोना विसरा... आता भारताच्या दारात ‘इबोला’! बंगळूरमध्ये महिला विलगीकरणात, नागपूरमध्येही वाढली चिंता

शिवसेना आमदारांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना साकडे, पालकमंत्र्यांची दिल्लीवारी; भाजपचं नाव ठरलं पण

Beed News: इंधन दरवाढ, नीट पेपरफुटी विरोधात बीडमध्ये एल्गार पँथर सेना आणि आंबेडकर विकास मंच आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Chhatrapati Sambhajinagar: शेतकरी महिला चढली पाण्याच्या टाकीवर; फेर रद्दच्या मागणीसाठी आंदोलन; पैठण तहसील परिसरातील प्रकार

SRH vs RR, Eliminator: हैदराबाद की राजस्थान, आज कोण होणार 'एलिमिनेट'? पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT