Khandeshi Bharit Recipe : बनवा खान्देशी स्टाइल वांग्याचे भरीत रेसिपी तेही घरच्या घरी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Khandeshi Bharit Recipe

Khandeshi Bharit Recipe : बनवा खान्देशी स्टाइल वांग्याचे भरीत रेसिपी तेही घरच्या घरी!

Khandeshi Bharit Recipe : जानेवारी महिना आला की सगळीकडे भरताचे वांगे दिसायला लागतात. गरम गरम चुलीवरच भरीत आणि पोळी म्हणजे स्वर्ग सुख. अर्थात आता घरात चूल असणं जरा दुर्मिळच; पण म्हणून भरतावरच प्रेम कमी होऊच शकतं नाही.

हेही वाचा: Kamshet Trip : आपल्या पार्टनर सोबत पॅराग्लायडिंगची मजा घ्या तीही पुण्यापासून अगदीच जवळ

वांग्याचे भरीत हे फक्त महाराष्ट्रातच नाही , तर उत्तर भारतातही खूप मनापासून खाल्लं जातं. भरीत बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत जसे की कच्चे भरीत, खान्देशी वांग्याचे भरीत, पंजाबी वांग्याचे भरीत, लाहोरी वांग्याचे भरीत, बनारस मध्ये प्रसिद्ध असलेल्या लिट्टी चोखा मध्ये चोखा म्हणजे वांग्याचं किवा बटाट्याच कच्च भरीत!

हेही वाचा: Travel In Pune : पुण्यातल्या पुण्यातच विकेंड प्लॅन करायचा आहे? मग पू.ल देशपांडे उद्यान आहे बेस्ट

सगळ्यांनाच खान्देशी जळगावी स्टाइल वांग्याचे भरीत खूप आवडत. मग बघूया याची रेसिपी

साहित्य :

2 मोठी भरताची वांगी (600 ग्रॅम)

2 मोठ्या आकाराचे कांदे (180 ग्रॅम)

1 मध्यम आकाराचा टोमॅटो (80 ग्रॅम)

¼ (पाव) कप कोथिंबीर

5-6 हिरव्या मिरच्या

8-10 लसूण पाकळ्या

1 इंच आल्याचा तुकडा

½ टीस्पून मोहरी

½ टीस्पून जिरे

½ टीस्पून हिंग

½ टीस्पून हळद

3 टेबलस्पून तेल

मीठ चवीनुसार

हेही वाचा: Saturday Astro Tips : शनिदेवांना तेल अर्पण करतांना चुकूनही या अवयवावर वाहू नका तेल, होईल नुकसान

कृती:

सर्वप्रथम वांगी पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर एका कोरड्या फडक्याने पुसून घ्यावीत. वांग्यांवर उभ्या चिरा मारुन घ्याव्यात आणि थोडा तेलाचा हात लावून गॅसवर जाळावर खरपूस भाजून घ्यावीत.

वांगी पूर्ण थंड होऊ द्यावीत आणि मगच सोलावीत. जोपयॅंत वांगी थंड होत आहेत तोपर्यंत कांदे, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरावेत.

हेही वाचा: Vastu Tips : शनिदोष सुरू झाला आहे? या रोपट्याने पडेल फरक!

एका खलबत्यात लसूण , मिरच्या आणि आले कुटून त्याचा जाडसर ठेचा बनवावा. जर मिक्सर ला वाटायचे असेल तर अजिबात पाणी न घालता फिरवून घ्यावे.

वांगी थंड झाली की ती सोलून घ्यावीत आणि त्याचा गर चांगला घोटून घ्यावा. पोटॅटो मॅशरचा वापर करावा किंवा सुरीने कापून घ्यावे.

कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी घालावी, मोहरी तडतडल्यानंतरच जीरे आणि हिंग घालावे. बारीक चिरलेला कांदा घालून तो चांगला पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यावा.

कांदा परतून झाला की हळद आणि लसूण, आले, मिरचीचा ठेचा घालावा. मंद आचेवर परतून घ्यावा जोवर आले लसणाचा कच्चेपणा निघून जात नाही.

जवळ जवळ 4 ते 5 मिनिटे परतल्यानंतर आता बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. टोमॅटो लवकर शिजणयासाठी थोडे मीठ घालावे. मध्यम आचेवर टोमॅटो परतून घ्यावा. नंतर आच मंद करून झाकण ठेवून टोमॅटोला पाणी सुटू द्यावे जेणेकरून तो चांगला मऊ शिजेल.

हेही वाचा: Vastu Tips : लक्ष्मीची कृपा हवी असेल तर या दिशेला अगरबत्ती लावा

टोमॅटो शिजुन त्याला तेल सुटू लागले की त्यात भाजून घेतलेल्या वांग्याचा लगदा घालावा.

चवीनुसार मीठ घालावे मंद आचेवर हे भरीत चांगले परतावे. भरीत परतताना ते भांड्याच्या तळाला चिकटणार नाही याची दक्षता घ्यावी. अगदी कडेने तेल सुटेपर्यंत भरीत जवळजवळ सात ते आठ मिनिटे परतावे .

तयार झाल्यावर त्यात उरलेली कोथिंबीर घालावी आणि कढई आचे वरुन खाली उतरवावी .

गरम गरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर हे भरीत खायला फार छान लागते .आवडत असल्यास बाजूला कच्चा कांदा आणि हिरवी मिरची द्यायला विसरू नका.