Food Tips : तूम्हीही शिजवण्याआधी चिकन स्वच्छ धुता का?; संशोधकांचा धक्कादायक खुलासा वाचाच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Food Tips

Food Tips : तूम्हीही शिजवण्याआधी चिकन स्वच्छ धुता का?; संशोधकांचा धक्कादायक खुलासा वाचाच!

आज रविवार असल्याने अनेकजणांनी चिकन, मटणावर ताव मारण्याचा बेत आखला असेल. घरोघरी चिकनचा घमघमाट सुटला असेल. रविवार अन् बुधवारी तर लोक मांसाहारावर जोर देतात. चिकन घरी आणल्यावर ते धुवूनच आपण शिजायला टाकतो. पण, असे करणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

शिजवण्यापूर्वी तुम्ही चिकनही धुता का? जर तुम्ही असे करत असाल तर ते बंद करा. ‘द कॉन्व्हरसेशन’ मधील एका अहवालानुसार, जगभरातील अन्न सुरक्षा संशोधक आणि अधिकारी असे सांगतात की, शिजायला टाकण्याआधी कच्चे चिकन धुवू नका. चिकन धुतल्याने स्वयंपाकघरात धोकादायक जीवाणू पसरतात.

हेही वाचा: Health Alert : व्हेज म्हणत तुम्ही चुकून नॉनव्हेज तर खात नाहीये, कसे ओळखाल? हे कोड्स कायम लक्षात ठेवा

चिकन न धुता पूर्णपणे शिजवणे चांगले आहे. म्हणून न धुता खाणे सुरक्षित आहे. पण या गोष्टीबद्दल फारशी माहिती कोणाला नाही. त्याबद्दल लोक जागरूक नाहीत, असे नव्या स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: Mutton Benefits : मटन खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

चिकन, मांस घरी केल्यावर ते स्वच्छ धुवून खाणे ही जणू परंपराच बनली आहे. ऑस्ट्रेलियाच्या फूड सेफ्टी इन्फॉर्मेशन कौन्सिलने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, अर्ध्याहुन जास्त ऑस्ट्रेलियन घरात शिजवण्याआधी चिकन धुतात. 25% ग्राहक चिकन एकदा नाही तर अनेकदा धुतात.

हेही वाचा: Chicken Soup Recipe : हिवाळ्यात शरीराला पौष्टिक असणारे चिकन सूप कसे तयार करायचे?

कच्च्या चिकनवर कँपिलोबॅक्टर आणि साल्मोनेला हे विषारी जिवाणू आढळतात. अशावेळी कच्चे चिकन धुतल्याने ते विषाणू चिकनमध्येच इतर ठिकाणी पसरतात. आणि त्यामूळे आपल्या जिवाला धोका होऊ शकतो.

हेही वाचा: Chicken Fry Recipe: रविवार स्पेशल चिकन फ्राय कसे तयार करायचे?

गेल्या दोन दशकांमध्ये कँपिलोबॅक्टर आणि साल्मोनेला विषाणूपासून आजार पसरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कँपिलोबॅक्टर  संसर्गाच्या दरवर्षी अंदाजे 220,000 प्रकरणांपैकी, 50,000 रूग्ण कँपिलोबॅक्टर  संसर्गामूळे झालेल्या आजारापासून येतात. त्यामूळे तूम्हालाही कँपिलोबॅक्टर विषाणूचा संसर्ग होऊ नये असे वाटत असेल तर चिकन धुणे बंद करा.

हेही वाचा: Fresh Mutton : मटण ताजे की शिळे कसे ओळखावे?

या आजाराचे निदान करण्यासाठी संशोधकांनी हाय-स्पीड इमेजिंगचा वापर केला. संशोधकांना आढळले की हाय टॅप हाईट्स स्पॅटर वाढवू शकतात. जिवाणू प्रसाराची पातळी अधिक पाण्याचा वापर केल्याने वाढते.

हा आजार ऑस्ट्रेलियात आहे आपल्याला काही काळजीचे काम नाही, असा विचार करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, कोरोना चीनमध्ये झाला तरी गेली दोन वर्ष आपण त्यातून गेलो आहोत. त्यामूळे काळजी घ्या.