Ganeshotsav 2021
Ganeshotsav 2021 esakal
ganesh article

साताऱ्यातील वाहतुकीत दोन दिवस बदल

गिरीश चव्हाण

सातारा : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा शहरातील वाहतुकीत बदल करण्‍यात आल्‍याची माहिती शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. गणेशोत्‍सवाची (Ganeshotsav 2021) सांगता परंपरेनुसार रविवारी होणार असली, तरी सातारा शहरातील बहुतांश मंडळे प्रथेप्रमाणे अनंत चतुर्दशीच्‍या (Anant Chaturdashi) आदल्‍या दिवशी सार्वजनिक मूर्तीचे विसर्जन करत असतात.

पोलिस प्रशासनाने मिरवणूक जाणाऱ्या मार्गावर आवश्‍‍यक त्‍या सोयीसुविधा उभारल्‍या आहेत.

विसर्जनासाठीची तयारी पालिका, तसेच पोलिस प्रशासनाने केली असून, मिरवणूक जाणाऱ्या मार्गावर आवश्‍‍यक त्‍या सोयीसुविधा उभारण्‍यात आल्‍या आहेत. शहरातील सार्वजनिक मंडळांची विसर्जन मिरवणूक पूर्वापार चालत आलेल्‍या मार्गाने होत असल्‍याने ता. १८ आणि ता. १९ रोजी शहरातील विसर्जन मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्‍यात येणार असून, इतर भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्‍यात येणार आहे. मिरवणुकीदिवशी बोगदा ते शाहू चौक हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद राहणार असून, बोगदा तसेच परळी, कास भागाकडून येणारी वाहने दोन दिवस बोगदामार्गे शेंद्रे व तिथून साताऱ्याकडे येतील व परत जातील, असेही शेलार यांनी जाहीर केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी तालीम संघ, गांधी मैदान, कोटेश्‍‍वर मैदान येथे वाहनतळ सुरू करण्‍यात येणार असून, नागरिकांनी वाहतूक व्‍यवस्‍थेतील बदलाची नोंद घेत सहकार्य करण्‍याचे आवाहनही शेलार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

बंदी असणारे मार्ग

कमानी हौद ते मोती चौक मार्ग

कमानी हौद ते शेटे चौक मार्ग

मोती चौक, ऐक्‍य कॉर्नर ते बुधवार नाका मार्ग

बुधवार नाका ते करंजे येथील आंदेकर चौक मार्ग

मोळाचा ओढा ते बुधवार नाका मार्ग

याठिकाणी वाहतुकीत बदल

बोगदा, समर्थ मंदिरमार्गे चांदणी चौकाकडे येणाऱ्या बस, तसेच इतर वाहने त्‍या मार्गाने न जाता समर्थ मंदिर चौकातून अदालतवाडामार्गे शाहू चौकाकडे मार्गस्‍थ होतील. मोळाचा ओढा येथून साताऱ्यात येणारी वाहने मोळाचा ओढा, महानुभाव मठ, करंजे, भूविकास बँक चौकामार्गे मार्गस्‍थ होतील. कोटेश्‍‍वर मंदिराकडून बस स्‍थानकाकडे जाणारी वाहने कोटेश्‍‍वर मंदिर चौकातून शाहूपुरी चौक, मोळाचा ओढामार्गे मार्गस्‍थ होतील. पोवई नाका येथून मोती चौकाकडे जाणारी वाहने अदालतवाडा रस्‍त्‍याने मार्गस्‍थ होतील. वाहतुकीत बदल करताना मिरवणूक मार्गावरील नागरिकांना त्‍यांची वाहने इतरत्र लावण्‍याचे आवाहनही वाहतूक शाखेने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

SCROLL FOR NEXT