अटक
अटक sakal
ग्लोबल

‘युपी’त ३५५ जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा

लखनौ - भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा व नवीनकुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी काढलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरुद्ध उत्तर प्रदेशात शुक्रवारी(ता. १०) केलेल्या हिंसक निदर्शनांप्रकरणी पोलिसांनी तीनशेपेक्षा जास्त जणांना अटक केली आहे. राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक(कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, की या हिंसाचारप्रकरणी राज्यातील आठ जिल्ह्यांतून ३०४ जणांना अटक केली असून नऊ जिल्ह्यांत १३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. अटक केलेल्यांमध्ये प्रयागराजमधील ९१, सहारणपूरमधील ७१, हाथरसमधील ५१, आंबेडकरनगर व मोराराबादमधील प्रत्येकी ३४ तर फिरोजाबाद, अलिगड, जालौनमधील सहाजणांचा समावेश आहे. याप्रकरणी प्रयागराज आणि सहारणपूरमध्ये प्रत्येकी तीन तर फिरोझाबाद, आंबेडकर नगर, मोराराबाद, हाथरस, अलिगड, लखिमपूर खेरीमधून प्रत्येकी एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला होता. शहरांमधील वातावरण बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. अशा समाजकंटकांना सुसंस्कृत समाजात स्थान नाही. निरपराध व्यक्तींना त्रास होता कामा नये. मात्र, एकाही दोषीला सोडले जाऊ नये, असे ते म्हणाले होते.

शुक्रवारी (ता. १०) मशिदीतील नमाजानंतर प्रयागराज, सहारणपूरसह उत्तर प्रदेशातील चार शहरांमध्ये मुस्लिम आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. नूपुर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांच्या अटकेची मागणी करत जमाव रस्त्यावर उतरला होता. प्रयागराजमध्ये जमावाने काही दुचाक्याही पेटवून दिल्या होत्या. त्याचप्रमाणे, पोलिसांच्या वाहनालाही आग लावली होती. पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रुधुराचा वापर करावा लागला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT