A Hindu temple was defaced with pro Khalistani slogans in California US 
ग्लोबल

खलिस्तान समर्थकांकडून अमेरिकेतील हिंदू मंदिर लक्ष्य; मोदींविरोधात लिहिला आक्षेपार्ह मजकूर

परदेशी भूमीवर खलिस्तानी अतिरेक्यांच्या कुरापती वाढतच चालल्या आहेत. अमेरिकेत एका हिंदू मंदिरावर खलिस्तान समर्थनार्थ (pro Khalistani slogans) आणि भारताच्या विरोधातील मजकूर भिंतीवर लिहिण्यात आल्या आहेत.

कार्तिक पुजारी

वॉशिंग्टन- परदेशी भूमीवर खलिस्तानी अतिरेक्यांच्या कुरापती वाढतच चालल्या आहेत. अमेरिकेत एका हिंदू मंदिरावर खलिस्तान समर्थनार्थ (pro Khalistani slogans) आणि भारताच्या विरोधातील मजकूर भिंतीवर लिहिण्यात आल्या आहेत. कॅलिफोर्नियाच्या निवार्क (Newark city) सिटीमधील हा प्रकार आहे. स्वामीनारायण मंदिर वसना संस्थाच्या भींतीवर आपेक्षार्ह मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

अमेरिकेतील हिंदू-अमेरिकेन संस्थेकडून यासंदर्भातील फोटो 'एक्स'वर शेअर करत माहिती देण्यात आलीय. फोटोमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आणि स्वतंत्र खलिस्तानचे समर्थन करणारा मजकूर भींतीवर लिहिण्यात आल्याचं दिसत आहे. (A Hindu temple was defaced with pro Khalistani slogans in California US The incident happened in Newark city)

संस्थेने यासंदर्भात तपासणी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवार्क पोलिसांकडे केली आहे. आवश्यक ती माहिती निवार्क पोलीस आणि नागरी अधिकार विभागाला यासंदर्भात आवश्यक माहिती देण्यात आल्याचं हिंदू-अमेरिकेन संस्थेने सांगितलं.

याआधीची असले प्रकार

हिंदू मंदिरावर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्याचा हा काही अमेरिकेतील पहिला प्रकार नाही. अशा प्रकारच्या घटना अमेरिका आणि शेजारच्या कॅनडामध्ये वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत.काही दिवसांपूर्वी कॅनडातील सुर्रे सिटीमधील हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. यावेळी मृत खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याचे पोस्टर मंदिर परिसरात लावण्यात आले होते.

दरम्यान, कॅनडा आणि अमेरिकाचा नागरिक गुरपतवत सिंग पन्नू हा कट्टर खलिस्तानी समर्थक असून तो या दोन देशांमधून भारत विरोधी कारवाई करत आहे. अनेकदा त्याने भारतावर हल्ला करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. पन्नूच्या पंजाबमधील संपत्तीची जप्ती करण्यात आली आहे. मात्र, अमेरिकेत बसून तो भारतावर आगपाखड करतच आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson ने राजस्थानची साथ सोडल्यास कॅप्टन कोण?

China criticized USA : भारतावर 'टॅरिफ बॉम्ब' फोडणाऱ्या अमेरिकेला आता चीननेही सुनावलं!

Gold Village: सोन्याचा पाऊस पडणारं गाव! महाराष्ट्रातील 'या सोनेरी गावाची' कहाणी तुम्ही ऐकलीये का?

Male News : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! शनिवारपासून अंधारबन, कुंडलिका व्‍हॅली पर्यटकांसाठी खुली, ऑनलाईन बुकिंग बंधनकारक

Latest Maharashtra News Updates: वडील रागावल्यामुळे मुलाने केली आत्महत्या, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT