A Mexico mayor married to alligator  esakal
ग्लोबल

Viral: प्रेम ते प्रेम असतं ! महापौरानं केलं चक्क मगरीशी लग्न

मेक्सिकोतील एका महापौराने चक्क मगरीशी लग्न केलंय.त्याच्या या लग्नातील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.

सकाळ ऑनलाईन टीम

लग्न म्हणजे आयुष्यतील अनेक महत्वाच्या निर्णयातील एक निर्णय मानला जातो.लग्नासाठी योग्य जोडीदाराच्या निर्णयापासून ते लग्नानंतरच्या आजिवन प्रवासाची अनेक स्वप्न यावेळी लग्नजोडपे बघत असतात.मात्र मेक्सिकोतील एका महापौराने चक्क मगरीशी लग्न केलंय.त्याच्या या लग्नातील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.

अलीकडे लेस्बियन,गे आणि सोलोगॅमी या कल्पना समाजात प्रचलित होत चालल्या आहेत. त्यामुळे 'गे' मुलामुलांचं लग्न किंवा 'लेस्बियन' मुलीमुलींचं लग्न लोकांना आता साधारण बाब वाटते.आणि त्यांच्याबाबतचा लोकांचा दृष्टिकोणही बदलत चाललाय.कायद्याने तर यांना अधिकार दिलाच आहे पण याबरोबरच समाजातील लोक देखील आता अश्यांच्या लग्नाला स्वीकारण्याएवढे समंजस झाले आहेत.

लग्नासाठी समंजस आणि प्रेम करणारा पार्टनर मिळावा अशी साहाजिक वाटणारी एक भावना सगळ्यांच्याच मनात असते.पण मात्र मेक्सिकोच्या या महापौराने चक्क मगरीशी लग्न केलंय.याचं सगळीकडून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.मगर हा असा जलचर प्राणी आहे ज्याची सगळ्यांनाच भिती वाटते.मात्र छान तयार करून तिला नौरी सारखं नटवून या महपौराने तिच्याशी आलिशान पद्धतीनं लग्न केलंय.या लग्नातील एक फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलाच वायरल होतोय.या फोटोमध्ये महापौर या मगरीला हाताशी घेऊन दिसतोय.आणि फोटोमध्ये लग्नाची जोरदार तयारीही त्याने केली असल्यांच चित्र तुम्हाला दिसेल.

सोशल मीडियावर वायरल झालेला हा फोटो ज्यानेही बघितला त्याला कमेंट केल्यावाचून या वेळी राहावलं नाही.कारण हा महापौर मगरीचा मुका घेतानाच्या पोजमध्ये दिसतोय.इन्स्टाग्रामवर वायरल झालेल्या या फोटोवर लोकांनी अनेक कमेंट केलेत.एकाने तर 'आता हेच बघायचं उरलंय', असा कमेंट केलाय तर दुसऱ्याने 'काय ?' लिहत आश्चर्य व्यक्त केलंय.तर तिसऱ्याने 'मुर्ख लोकांची कमी नाही', असा कमेंट केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT