Mahatma-Gandhi 
ग्लोबल

'गांधीगिरी' संदर्भात अमेरिकेच्या संसदेत मोठा निर्णय!

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत एक विशेष विधेयक मांडण्यात आले आहे.

नागरी हक्क नेते खासदार जॉन लुईस यांनी हे विधेयक मांडले. तसेच पुढील पाच वर्षांसाठी 15 कोटी अमेरिकन डॉलर एवढ्या निधीची मागणी त्यांनी विधेयकात केली आहे. 

महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधत ही घोषणा करण्यात आली. यासाठी जाहीर करण्यात आलेले 'हाऊस बिल' (एचआर 5517) हे जगातील सर्वांत मोठ्या दोन मोठ्या लोकशाही देशांमधील मैत्री संबंधांना दर्शवत आहे. तसेच या विधेयकामध्ये 'गांधी-किंग विकास फाउंडेशन'ची स्थापना करण्याबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे.

'युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट' (यूएसएआयडी) या भारतीय कायद्यांतर्गत या फाउंडेशनची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी 'यूएसएआयडी'ला पुढील पाच वर्षांसाठी दर वर्षी तीन कोटी रुपये इतके अनुदान दिले जावे, अशी मागणीही या विधेयकात करण्यात आली आहे. नवभारत टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या विधेयकात असे म्हटले आहे की, हे फाउंडेशन अमेरिका आणि भारत सरकार संयुक्तरित्या परिषद स्थापन करेल. आणि ही परिषद आरोग्य, प्रदूषण आणि हवामान बदल, शिक्षण, महिला सशक्तीकरण या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या अशासकीय संस्थांना अनुदान देण्याची व्यवस्था करेल. या विधेयकाला भारतीय वंशाच्या अमेरिकी खासदार डॉ. एमी बेरा, रो खन्ना आणि प्रमिला जयपाल यांच्यासह ब्रेंडा लॉरेन्स, ब्रांड शेरमैन आणि जेम्स मैकगवर्न यांनी पाठबळ दर्शविला आहे.

अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यांनी या विधेयकाचे स्वागत केले आहे. याबाबत बोलताना श्रृंगला म्हणाले, ''भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये सांस्कृतिक आणि वैचारिक संबंध आणखी मजबूत करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणाच्या सांडव्यावरून 18,337 तर वीज गृहातून 1,050 क्युसेक विसर्ग; सहा वक्र दरवाजे चार फुटांवरून तीन फुटांपर्यंत आणले खाली

Maharashtra Farmer Loan Waiver : वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; 10 कोटी 20 लाखांचा लाभ मंजूर

Amazon Great Freedom Sale 2026: आजपासून मेगा सेल! Galaxy S25 Ultra 40 हजारांनी स्वस्त, पाहा कोणत्या वस्तूंवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Marathi News Live Updates : भंडारा येथे तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार, आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी भव्य आक्रोश मोर्चा

Koyna Dam Tailrace Water Issue : समुद्रात जाणारे कोयनेचे पाणी कोकणाला मिळणार का? पुन्हा नवे सर्वेक्षण सुरू; 'हा' निर्णय ठरवणार भविष्य

SCROLL FOR NEXT