USA COPS
USA COPS 
ग्लोबल

VIDEO: 'माझा श्वास कोंडतोय'; अमेरिकेत पुन्हा जॉर्ज फ्लॉईडसारखी घटना, पोलिसांचा निर्दयीपणा कॅमेऱ्यामध्ये कैद

कार्तिक पुजारी

वॉशिंग्टन- अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा चीड आणणारी घटना घडली आहे. एका कृष्णवर्णीय व्यक्तीला (Black man dies) पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला जमिनीवर झोपवल्यानंतर त्याच्या मानेवर गुडघा टेकवण्यात आला होता. या व्यक्तीचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. याप्रकरणावरुन वाद निर्माण झाला असून मोठ्या आंदोलनाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

२०२० मध्ये अशाच प्रकारे जॉर्ज फ्लॉईड नावाच्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे अमेरिकेमध्ये मोठा जनक्षोभ उसळला होता. काही पोलिसांवर देखील कारवाई करण्यात आली होती. आता या ताज्या घटनेमुळे २०२० च्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं बोललं जातंय. लोकांमध्ये त्यामुळे रोष निर्माण झाला आहे.

कॅन्टॉन पोलीस विभागाने एक व्हीडीओ रिलिझ केलाय. यामध्ये फ्रॅन टायसन या ५३ वर्षीय व्यक्तीच्या अटकेची दृष्य दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एका बारमध्ये दोन पोलीस घुसतात आणि टायसनला पकडतात (pinned down by cops). यावेळी टायसन मदतीची याचना करतो, मी श्वास घेऊ शकत नाहीये अशा प्रकारचे आर्जव तो करतो. पण, पोलीस अधिकारी त्याच्या मानेवर गुडघा जोरात दाबतो अन् म्हणतो तुला काही होणार नाही.

एक पोलीस म्हणतो की, 'मला नेहमीच बारमधील भांडणात पडायचं होतं.' व्हिडिओमध्ये दिसतंय की, काही मिनिटांनी टायसन बेशुद्ध पडतो. पोलिसांना हे लक्षात येतं. त्यानंतर वैद्यकीय मदत बोलावली जाते. त्यानंतर टायसनला अॅम्बुलन्समध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

टायसनसोबत घडलेली घटना पाहून अनेकांना २०२० मध्ये जॉर्ज फ्लॉईडसोबतचा (George Floyd death in 2020) प्रसंग आठवला आहे. फ्लॉईडच्या मृत्यूनंतर जगभरातून संताप पाहायला मिळाला होता. फ्लॉईड याला न्याय मिळावा यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात आरोपी असलेले पोलिस Beau Schoenegge आणि Camden Burch हे प्रशासकीय सुट्टीवर गेले आहेत. ओहिओ ब्युरोच्या गु्न्हे तपास विभागाने हे प्रकरण तपासासाठी प्रलंबित ठेवलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT