President Joe Biden of the United States and Chinese President Xi Jinping सकाळ डिजिटल टिम
ग्लोबल

अमेरिका खोटी माहिती पसरवत आहे; चीनचा गंभीर आरोप

आम्हाला चीनच्या मदतीची गरज नाही, सोमवारी रशियाने स्पष्ट केले

सकाळ डिजिटल टीम

२४ फेब्रुवारीपासून सुरु असलेले रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहे. यातच युद्ध सुरु झाल्यापासून रशियाने चीनकडे लष्करी मदत मागितली असून काही लष्करी उपकरणे चीनकडून घेतली असल्याची माहिती फायनान्शियल टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्टने रविवारी अमेरिकन अधिकाऱ्यांचा हवाला देत हे वृत्त दिलं होतं. आता यावर रशियाला मदत करण्याविरोधात अमेरिकेने चीनला इशारा दिलाय तर यावर चीनने खोटी माहिती पसरवल्याचा अमेरिकेवर आरोप केलाय. (China has accused the united states has been spreading false information against china on the ukraine issue)

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन (US National Security Advisor Jake Sullivan) यांनी युक्रेनवरील युद्धात रशियाला लष्करी मदत देण्याबाबत चीनला चेतावणी दिली तर यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन अधिकाऱ्यांवर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केलाय.

चीन रशियाला शस्त्रास्त्रांसाठी मदत करेल का या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान (Zhao Lijian) यांनी सोमवारी सांगितले की,“अलीकडे युक्रेनच्या मुद्द्यावर अमेरिका चीनविरुद्ध चुकीची माहिती पसरवत आहे.युक्रेन मुद्द्यावर चीनची भूमिका खुप स्पष्ट असून चीनने शांततेला प्रथम प्राधान्य दिले."

सोमवारी रशियाने स्पष्ट केले की, त्यांना चीनच्या मदतीची गरज नाही. रशियाकडे युद्ध सुरू ठेवण्याकरीता पुर्ण क्षमता आहे, असे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह (Dmitry Peskov) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठ्यातील जिल्हाअधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT