Economic crisis on Sri Lanka  esakal
ग्लोबल

राष्ट्रपतींच्या भावाचा दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न; प्रवाशांनी विमानतळावर ओळखलं अन्..

श्रीलंका गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

श्रीलंका गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

Economic crisis on Sri Lanka : श्रीलंकन (Sri Lanka) राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांचे भाऊ आणि माजी अर्थमंत्री बासिल राजपक्षे (Basil Rajapaksa) यांनी आंदोलनादरम्यान आंतरराष्ट्रीय विमानानं दुबईला (Dubai) पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, विमानतळावरील (Airport) प्रवाशांनी त्यांना ओळखलं आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी (Immigration officer) त्यांच्या प्रवासाला मंजुरी देण्यास नकार दिला.

बासिल राजपक्षे आज सकाळी कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Colombo International Airport) व्हीआयपी (VIP) टर्मिनलमधून दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, काही लोकांनी त्यांना ओळखलं आणि देश सोडून जाण्याला विरोध केला. सूत्रांनी सांगितलं की, बासिल राजपक्षे 12:15 वाजता चेक-इन काउंटरवर पोहोचले. यावेळी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना मंजुरी देण्यास नकार दिल्यामुळं ते 3:15 पर्यंत तिथंच (विमानतळ) राहिले. अखेर त्यांना विमानतळ सोडून परत जावं लागलं.

दरम्यान, भारत सरकारच्या सूत्रांनी बासिल राजपक्षे यांना भारतात आश्रय दिल्याचं वृत्त फेटाळून लावलंय. देशाच्या प्रचंड आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राजीनामा देणारे राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी भारतात आश्रय घेतल्याचंही वृत्त फेटाळलंय. श्रीलंकेच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याला देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली जात नाहीय. श्रीलंका सध्या गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून विरोधकांनी राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानावर कब्जा केलाय.

अधिकृत सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तसंस्था एएफपीनं वृत्त दिलंय की, श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनाही विमानतळावर अपमानाचा सामना करावा लागला आणि इमिग्रेशन कर्मचाऱ्यांनी त्यांना देश सोडू दिला नाही. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना पदावर असताना अटक करता येत नाही आणि त्यामुळंच अटकेपूर्वी त्यांना देश सोडायचा आहे, असं मानलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सने घरात घुसून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवले; डेव्हिड मिलरने ३ चेंडूंत फिरवली मॅच, गुणतालिकेत बदल

Hormuz Crisis: होर्मुजमध्ये २ जहाजांवर हल्ला, युद्धाची चाहूल! भारतीय टँकर्सनी घेतला यू-टर्न; ८.३ मिलियन बॅरल तेल अडकले

फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या गोलंदाजाचा मृत्यूशी संघर्ष! ICU मधील त्याची अवस्था पाहून क्रिकेट विश्वात हळहळ...

Rahul Gandhi FIR प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःचाच आदेश थांबवला, नेमकं काय घडलं?

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

SCROLL FOR NEXT