अशोक स्तंभातील सिंह बदलला म्हणणाऱ्या आपच्या खासदाराला भाजपचं चोख प्रत्युत्तर; मिश्रा म्हणाले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

पंतप्रधान मोदींनी नवीन संसद भवनाच्या इमारतीवर 20 फूट उंच अशा अशोक स्तंभाचं अनावरण केलंय.

अशोक स्तंभातील सिंह बदलला म्हणणाऱ्या आपच्या खासदाराला भाजपचं चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : देशात नव्या संसद भवनाचं काम वेगात सुरू आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नवीन संसद भवनाच्या इमारतीवर, 20 फूट उंच अशा अशोक स्तंभाचं (National Emblem) अनावरण केलं. मात्र, याबाबत आता सातत्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत. आता राष्ट्रचिन्ह (अशोक स्तंभ) बदलण्यात आल्याचं बोललं जात आहे.

काल (सोमवार) ऑल इंडिया मजलिस-ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनीही या अनावरणाला घटनात्मक नियमांचं उल्लंघन म्हटलंय. तसंच इतर पक्षांना कार्यक्रमाला निमंत्रित न केल्यामुळं काँग्रेसमध्येही (Congress) नाराजी आहे.

आता आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी राष्ट्रीय चिन्ह (अशोक स्तंभ) बदलल्याचा आरोप केलाय. एक ट्विट शेअर करत संजय सिंह यांनी प्रश्न उपस्थित केलाय की, मला 130 कोटी भारतीयांना विचारायचं आहे की राष्ट्रीय चिन्ह बदलणाऱ्यांना 'देशविरोधी' बोलायचं की नाही?

हेही वाचा: अशोक स्तंभाचं बांधकाम करणाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी विचारले 'हे' 5 मजेशीर प्रश्न

संजय सिंह यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, 'जुन्या अशोक स्तंभात सिंह गंभीर मुद्रेत जबाबदार शासकासारखा दिसतोय तर, दुसर्‍यामध्ये (संसदेच्या इमारतीवर) तो मनुष्यभक्ष्य शासकाच्या भूमिकेत भीती पसरवण्यासारखा दिसत आहे. मात्र, संजय सिंह यांच्या या ट्विटवर येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये त्यांना घेरलंय. युजर्सनी अशोक स्तंभाचे जुने फोटो शेअर केले आहेत. दोघांमध्ये काही फरक नाही, असं त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा: संतोष बांगरांनंतर शिंदे गटातील आणखी एका बंडखोराला शिवसेनेचा दणका

अशोक स्तंभ 20 फूट उंच

नवीन अशोकस्तंभाचा फोटो अगदी जवळून काढण्यात आलाय, त्यामुळं तो असा दिसत असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. यावर भारतीय जनता पक्षाचे नेते कपिल मिश्रा (Kapil Mishra) यांनीही ट्विट केलंय. त्यांनी संजय सिंह यांना टोला लगावलाय. नवीन संसद भवनाच्या छतावर बसवलेला हा अशोक स्तंभ खूप मोठा आहे. त्याची उंची 20 फूट असून त्याचं वजन 9500 किलो आहे. हे हाताळण्यासाठी साडेसहा हजार किलोची रचना करण्यात आली असून ती पूर्णपणे स्टीलची आहे. नवीन संसद भवनाच्या छतावरील अशोक स्तंभाचे प्रतीक आठ टप्प्यांच्या प्रक्रियेनंतर तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

Web Title: National Emblem Ashok Stambh New Parliament Building Lion Changed Says Aap Sanjay Singh Kapil Mishra Attacks

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..