G7 
ग्लोबल

जी७ देशांशी बायडेन करणार चर्चा

यूएनआय

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन येत्या शुक्रवारी जी७ समूहातील नेत्यांशी चर्चा करतील. ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या बैठकीत कोरोनाची जागतिक साथ, जागतिक अर्थव्यवस्था आणि चीनचा सामना अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बायडेन यांची जगातील श्रीमंत लोकशाही देशांच्या प्रमुखांबरोबरील ही पहिलीच बैठक आहे. जी७ समूहातील प्रमुख नेतेही गेल्या वर्षी एप्रिलपासून प्रथमच एकत्र येतील. यासंदर्भात व्हाइट हाऊसने एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार या बैठकीच्या निमित्ताने बायडेन यांना कोरोनाच्या जागतिक साथीचा पराभव आणि जागतिक अर्थव्यवस्थेची फेरबांधणी यासाठीच्या योजनांबाबत प्रमुख श्रीमंत देशांबरोबर चर्चा करण्याची संधी मिळाली आहे. बायडेन लसीचे उत्पादन आणि वितरणाविषयी भाष्य करतील. नव्याने उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी देशाची क्षमता वाढविणे तसेच आरोग्य सुरक्षा वित्तपुरवठा यंत्रणा निर्माण करण्यासाठी एकत्रित संघटन आणि सहकार्यावरही त्यांचा भर असेल.

चीनचे आव्हान
चीनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्रित स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी गुंतवणुकीची गरज आणि जागतिक नियम अद्ययावत करण्याचे महत्त्व याविषयी सुद्धा बायडेन चर्चा करतील. अमेरिकेचे अर्थ मंत्री जॅनेट येलेन यांनी जी७ समूहातील सहकाऱ्यांशी गेल्याच आठवड्यात चर्चा केली होती. आर्थिक पीछेहाट भरून काढण्यासाठी वित्त क्षेत्रातील पाठिंबा कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

अमेरिका फर्स्ट...
रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते बायडेन यांनी महासत्तेच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याचा मान मिळविला. ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट हे घोषवाक्य बनविले होते, पण चार वर्षांच्या खंडानंतर जगातील प्रमुख देश तसेच प्रमुख जागतिक संघटनांशी पुन्हा हस्तांदोलन करण्याचे बायडेन यांचे धोरण असेल. त्यादृष्टिने जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) आणि पॅरिस हवामान  करारातही अमेरिकेने पुनरागमन केले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT