
ब्रिटनचे प्रिंस हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल यांना दुसऱ्यांना बाळ होणार आहे.
लंडन : ब्रिटनचे प्रिंस हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल यांना दुसऱ्यांना बाळ होणार आहे. व्हँलेंटाईन डेला त्यांच्या प्रवक्त्यांनी ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे. या दाम्पत्याने एक ब्लॅक एँड व्हाईट फोटो जाहीर केला आहे, ज्यामध्ये एका झाडाखाली दोघेही हसऱ्या मुद्रेत दिसत आहेत. यामध्ये 39 वर्षाच्या मर्केल या गर्भवती असल्याचं दिसत आहे. त्यांच्या प्रवक्त्यांनी मोठ्या मुलाचा संदर्भ देत म्हटलंय की, आर्ची मोठा भाऊ बनणार आहे. आता हे दाम्पत्य आपल्या दुसऱ्या मुलाच्या आशेने अत्यंत आनंदीत आहे.
मेगन आणि 36 वर्षीय हॅरी जे महाराणी एलिझाबेथ यांचे दुसरे नातू आहेत, त्यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये फ्रंटलाइन रॉयल ड्यूटी सोडून दिली होती आणि आता ते कॅलिफॉर्नियात राहतात.
हेही वाचा - म्यानमारमध्ये पोलादी पकड घट्ट; संशयावरून कोणालाही ताब्यात घेण्याची सैनिकांना परवानगी
गेल्या वर्षी जानेवारीमध्येच प्रिंस हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल यांनी ड्यूक ऑफ ससेक्स आणि डचेस ऑफ ससेक्सची शाही उपाधी सोडण्याची घोषणा केली होती. याआधी या दाम्पत्याने मे 2019 मध्ये एका मुलाला जन्म दिला होता, ज्याचं नाव आर्ची आहे. प्रिस हॅरी आणि मेगन मर्केल मे 2018 मध्ये विवाहबद्ध झाले होते.