America President 
ग्लोबल

America President : "हिंदूंनी ठरवलं तर ते अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष ठरवू शकतात"

Sandip Kapde

America President :   अमेरिकेच्या सत्तेचे केंद्र मानल्या जाणाऱ्या कॅपिटल हिल येथे बुधवारी पहिल्यांदाच हिंदू-अमेरिकन शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू-अमेरिकन समुदायाला पाठिंबा देण्यासाठी अनेक अमेरिकन खासदारांनी देखील सम्मेलनात सहभाग घेतला होता. यावेळी  रिपब्लिकन खासदार मॅककॉर्मिक यांनी मोठ वक्तव्य केल आहे.

अमेरिकेच्या विकासात हिंदू समुदायाचे मोठे योगदान आहे. या समुदायात इतकी ताकद आहे की ते अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष कोण हे ठरवू शकतात, असे मॅककॉर्मिक म्हणाले. अमेरिकेत काल (बुधवार) झालेल्या शिखर परिषदेत अनेक अमेरिकन खासदार आणि राजकीय वकिलांचा गट सामील झाला होता. या शिखराची सुरुवात वैदिक मंत्रोच्चाराने झाली. (America President News)

Americans4Hindus ने आयोजित केलेल्या या शिखर संमेलनात देशभरातील हिंदू समुदायाचे नेते सहभागी झाले होते. त्याचबरोबर इतर २० संघटनांनीही या परिषदेला पाठिंबा दिला. Americans4Hindus चे अध्यक्ष आणि हिंदू-अमेरिकन समिटचे मुख्य आयोजक  रोमेस जापरा  म्हणाले, "आमची हिंदू मूल्ये पूर्णपणे अमेरिकन संवैधानिक मूल्यांशी सुसंगत आहेत. अमेरिकन नागरिकही गीता वाचतात."

रिपब्लिकन काँग्रेसचे रिच मॅककॉर्मिक म्हणाले, "मला या स्थलांतरित लोकसंख्येबद्दल खूप आदर आहे. त्यांनी अमेरिकेत बरीच भर घातली आहे. सर्व काही उत्कृष्ट आहे. मी हे पुन्हा पुन्हा सांगतो की या समुदायाने जागरूकता दाखवल्यास त्यांच्याकडे किती शक्ती आहे हे त्यांना कळेल, मग ते अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष देखील ठरवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मित्रांनीच केला घात! मित्राच्या पत्नीसोबतच २ मित्रांचं नको ते कृत्य, ४ वर्षीय मुलाला जीवे मारण्याची धमकी; विरारमध्ये खळबळ

Sugarcane Price Protest: तोडगा निघेपर्यंत कारखाना बंद ठेवू; महाडिक ; ‘राजाराम’वर ट्रॅक्टर-ट्रॉल्या रोखून ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

Latest Marathi News Live Update : रशियन कच्च्या तेलाबाबत भारताची मोठी रणनीती, दीर्घकालीन करारांची घाई नको; रुपया मजबूत करण्यासाठीही ठरू शकतो दिलासा

बाजूला हो ना... फराह खानचा कपाळावर टिळा लावून घेण्यास नकार; Viral Video पाहून नेटकरी संतापले; म्हणतात-

लालकृष्ण अडवाणी यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू, केंद्रीय मंत्री नड्डा यांनी घेतली भेट; हेल्थ बुलेटिन आलं समोर

SCROLL FOR NEXT