Kabul Blast: Massive explosion near Indian Embassy in Afghan capital, no casualties reported 
ग्लोबल

काबूलमध्ये भारतीय दुतावासाजवळ स्फोट

वृत्तसंस्था

काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज (बुधवार) सकाळी भारतीय दुतावासाजवळ शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. मात्र, या स्फोटात दुतावासातील एकही भारतीय नागरिक जखमी झालेला नाही. मात्र, या स्फोटात 60 जण जखमी झाल्याचे सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

भारतीय दुतावासापासून दीड किमी अंतरावर हा शक्तीशाली स्फोट झाला. इराणच्या दुतावासाला लक्ष्य करून हा स्फोट घडविण्यात आला. या स्फोटात 60 जण जखमी असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. स्फोटानंतर भारतीय दुतावासाच्या इमारतीच्या काच्या फुटल्या. या स्फोटानंतर भारतीय दुतावासातील सर्वजण सुखरुप आहेत, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट केले आहे.

काबूलमधील वजीर अकबर खान भागात असलेल्या इराणच्या दुतावासाला लक्ष्य करुन स्फोट घडविण्यात आला. अध्यक्षांचे निवासस्थानही स्फोटाच्या ठिकाणापासून जवळच आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून स्वीकारण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VVS Laxman: गौतम गंभीर नाही, आशियाई क्रीडा स्पर्धेत VVS लक्ष्मण सांभाळणार टीम इंडियाची धुरा ?; BCCIचा मोठा निर्णय

Gondia News: ‘डॉक्टरांनी बाळाची एकदाही तपासणी केली नाही’; तीन दिवसांच्या नवजात बाळाचा मृत्यू, हलगर्जीपणाचा आईचा आरोप

Philips 5G Smartphone: IP64 रेटिंगसह लाँच! 5700mAh बॅटरी अन् 64MP कॅमेरा; पाहा किंमत आणि भन्नाट फीचर्स..

Marathi News Live Updates : ईडीचे कोलकातामधील ११ ठिकाणी छापे

Bihar Jharkhand Water Dispute: बिहार-झारखंडमधील २५ वर्षांचा तंटा मिटला; सोन नदीच्या पाणीवाटपावर अखेर एकमत, अधिक फायदा कोणाला?

SCROLL FOR NEXT