Parvez
Parvez 
ग्लोबल

लष्कर-ए-तोयबाचा समर्थक, संघटनेलाही मी आवडतो : परवेझ मुशर्रफ

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा मी सर्वात मोठा समर्थक आहे. या संघटनेलाही मी आवडतो, असे वक्तव्य पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी केले. तसेच त्यांनी जमात-उद-दवाह आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांकडून केल्या जाणाऱ्या कारवायांचे समर्थनही केले.

पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. जमात-उद-दवाह आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांकडून जगभरात दहशत माजवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे अशा दहशतवादी संघटनांचा जगभरातून निषेध केला जात आहे. मात्र, मुशर्रफ यांनी अशा दहशतवादी संघटनांचे समर्थन केले आहे. मी लष्कर-ए-तोयबाचा समर्थक असून, या संघटनेलाही मी आवडतो, असे ते म्हणाले. 

यावेळी मुशर्रफ यांना हाफिज सईदच्या कारवायांचे समर्थन करता का, असा सवाल केला गेला. यावर ते म्हणाले, हाफिझ सईदचा काश्मीरमधील कारवायांमध्ये सहभाग आहे आणि मी त्या कारवायांचे समर्थन करतो, असे त्यांनी सांगितले.  

दरम्यान, पाकिस्तानच्या न्यायालयाने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जमात-उद-दवाह या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याची काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या नजरकैदतून सुटका केली होती. त्यानंतर आता मुशर्रफ यांनी हे वक्तव्य केले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT