India Nepal Relation News esakal
ग्लोबल

PM मोदींच्या घोषणेने नेपाळचा संताप, काम बंद करण्यास सांगितले

असे काय घडले की ज्यामुळे नेपाळ या शेजारील देशाने भारतावर संताप व्यक्त केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारत-नेपाळ सीमेजवळ रस्ता बांधणीची घोषणा करताच नेपाळने संताप व्यक्त केला आहे. लिपुलेख भागात पंतप्रधान मोदी यांनी रस्त्याच्या विस्ताराची घोषणा केली होती. यावर नेपाळने आक्षेप नोंदवून म्हटले की ही बांधणी अवैध आहे. नेपाळने रविवारी (ता.१६) भारताला काली नदी क्षेत्रात रस्त्यांची एकतर्फी बांधणी आणि विस्तार थांबवण्यास सांगितले आहे. नेपाळचा हा विरोध पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लिपुलेख क्षेत्रात रस्त्यांचा विस्ताराची घोषणेनंतर काही दिवसानंतर सुरु झाला आहे. त्यावर नेपाळ (Nepal) आपला दावा करित आहे.(Nepal Object India's Road Construction In Lipulekh Area)

३० डिसेंबर रोजी उत्तराखंडच्या हलद्वानीमध्ये भाजपच्या वतीने आयोजित एका निवडणूक प्रचार फोरीला संबोधित करताना मोदींनी घोषणा केली होती, की सरकार उत्तराखंडच्या लिपुलेखमधील रस्ता आणि आणखीन रुंद करणार आहे. नेपाळचे सूचना आणि प्रसारणमंत्री आणि मंत्रिमंडळाचे प्रवक्ता ज्ञानेंद्र बहादूर कार्की म्हणाले, की काली नदीच्या पूर्वेत लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी आदी क्षेत्र नेपाळचा अविभाज्य भाग असून भारताने रस्त्यांची कामे व विस्तार थांबवला पाहिजे.

नेपाळ आणि भारतादरम्यान सीमेवरील वाद राजनयिक माध्यमांतून सोडवले पाहिजे. जे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांनुरुप आहे, असे कार्की म्हणाले. नेपाळची प्रतिक्रिया भारताच्या (India) प्रतिक्रियेनंतर आली आहे. भारताने जोर देऊन म्हटले आहे, की रस्त्याचे काम भारतीय क्षेत्रात सुरु आहे. मात्र एक प्रस्ताव ही दिला गेली आहे की द्विपक्षीय मैत्रीच्या माध्यमातून कोणताही वाद मिटवला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT