
ब्रिटनच्या गुप्तचर एजन्सी MI5 चा दावा,चीनने दिली ब्रिटिश खासदारांना लाच
नवी दिल्ली : ब्रिटिश गुप्तचर संस्थेने (UK Spy Agency Mi5) इशारा देत म्हटले आहे, की चीनच्या कम्युनिस्ट सरकारच्या (Chinese Communist Party) वतीने चीनच्या एका नागरिकाने ब्रिटनच्या संसदेपर्यंत घुसखोरी केली आहे. त्या चिनी नागरिकाचा (China) हेतू ब्रिटनची (Britain) अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करण्याचा होता. गुप्तचर एजन्सीने दावा केलाय की चीनी नागरिक चिनी सरकारसाठी काम करित आहे. चीनवर अगोदरही पाळत ठेवण्याचा आरोप करण्यात आलेला आहे. जगभरातील माहिती चोरणे आणि राजनयिक हेराफेरी करण्याचा आरोपही या देशावर केला जात आहे.(Britain Uk Spy Agency Mi5 Has Warned Chinese Agent For Infiltration In British Parliament)
हेही वाचा: माध्यमांचं स्वातंत्र्य, ब्रिटन आणि भारत !
चिनी नागरिकाचा पत्ताच नाय
याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी करुन संसदेचे सभापती लिंडसे होयली म्हणाले, की क्रिस्टिनी चिंग कुई ली (Christine Ching Kui Lee) चिनी नागरिक आहेत. चीन सरकारच्या वतीने ब्रिटनच्या खासदारांना प्रभावित करण्याचे काम केले जात आहे. ली लंडनमध्ये खूप प्रसिद्ध आहे. मात्र त्या सध्या कुठे आहेत याची माहिती नाही. ली यांच्यावर आरोप आहे की त्यांनी ब्रिटनच्या राजकारण्यांना निधी दिला आहे. हा निधी चीन आणि हाँगकाँगच्या नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे. चीनने हे आरोप फेटाळून लावत म्हटले आहे, की ब्रिटन चीनला घाबरवणे-धमकावण्याचा प्रयत्न करित आहे. आतापर्यंत ली यांच्या आर्थिक मदती मागील उद्देश काय आहे हे अद्याप कळले नाही.
हेही वाचा: चीननं दिली धमकी; अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटनवर निशाणा
एमआय ५ चा आरोप काय आहे?
ब्रिटनची गुप्तचर संस्था एमआय ५ ने दुर्मिळ इशारा जारी केला आहे. हा इशारा सुरक्षा सेवा हस्तक्षेप इशारा म्हणून ओळखला जातो. याचा अर्थ खूपच संकटाच्या काळात हा इशारा दिला जातो. एमआय ५ नुसार चीनची कम्युनिस्ट पक्षाच्या संयुक्त मोर्चा कार्य विभागासाठी गुप्त योजनांवर काम करते. ली माहिती जमा करणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रभावित करण्याच्या चीन सरकारच्या मोहिमेवर आहे. प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे, की काही विद्यमान आणि भावी संभाव्य खासदार होणाऱ्या नेत्यांना निधी हस्तांतर केला आहे. हा निधी का दिला गेला आहे याचे कारण कळलेले नाही. मात्र सदरील निधी चीन सरकारकडून दिल्या गेल्याचे स्पष्ट होतेय. हे कृत्य अमान्य आहे. हे थांबवण्यासाठी सर्वप्रकारचे पावले उचलले जातील, असे संसदेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Web Title: Britain Uk Spy Agency Mi5 Has Warned Chinese Agent For Infiltration In British Parliament
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..