Nepal Plane Crash
Nepal Plane Crash Sakal
ग्लोबल

Nepal plane crash : घटनास्थळावरून 21 मृतदेह शोधण्यात यश; एक बेपत्ता

सकाळ डिजिटल टीम

काठमांडू : नेपाळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या 'तारा एअरलाइन्स' च्या विमानाच्या ढिगाऱ्यातून 21 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाकडून सोमवारी देण्यात आली आहे. तारा एअरलाइन्सचे विमान मुस्तांग जिल्ह्यात क्रॅश झाले होते. (Nepal Plane Crash News)

तारा एअरलाइन्सच्या विमानाने 22 जणांसह पोखरा येथून रविवारी सकाळी 9.55 वाजता उड्डाण केले होते. त्यानंतर अवघ्या 12 मिनिटांनंतर विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. त्यानंतर या विमानाचा युद्धपातळीवर शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. अपघातग्रस्त विमान हे विमान कॅनडाच्या डी हॅविलँडने बनवलेले होते ज्याने 40 वर्षांपूर्वी पहिले उड्डाण केले होते, असे वृत्त एएफपीने दिले आहे.

या अपघातात चार भारतीय नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेतील 21 जणांचे मृतदेह सापडले असून एका बेपत्ता प्रवाशाचा शोध घेतला जात असल्याचे नेपाळ लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी एएफपीला सांगितले.

दरवर्षीची सुट्टी ठरली अखेरची

नेपाळमधील या विमान दुर्घटनेत चार भारतीयांचादेखील मृत्यू झाला आहे. हे भारतीय मूळचे ठाण्याचे असून यामध्ये अशोक कुमार त्रिपाठी आणि वैभवी बांदेकर हे विभक्त दाम्पत्य तसेच धनुष आणि रितिका या त्यांच्या मुलांचा समावेश आहे. अशोक कुमार आणि वैभवी हे विभक्त दाम्पत्याला दरवर्षी सुट्टीवर जाण्याचे निर्देश कौटुंबिक न्यायालयाने दिले होते. त्यानुसार हे दोघेही यंदा नेपाळ येथे पर्यटनासाठी गेले होते. परंतु, त्यातच हा अपघात घडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT