pakistan embassy shots fired at pakistan embassy in afghanistan kabul
pakistan embassy shots fired at pakistan embassy in afghanistan kabul  
ग्लोबल

Pakistan Embassy : काबूलमधील पाकिस्तानच्या दूतावासावर हल्ला; राजदूताच्या हत्येचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

अफगाणिस्तानातील काबुलमध्ये शुक्रवारी (2 डिसेंबर 2022) पाकिस्तानी दूतावासावर हल्ला झाला. या हल्ल्यात पाकिस्तानी दूतावासाचे प्रमुख उबेद रहमान निजामानी यांच्या हत्तेसाठी हा हल्ला करण्यात आला आहे. राजदूताला वाचवण्याच्या प्रयत्नात सुरक्षा रक्षकाला गोळी लागली. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दूतावासातील एका अधिकाऱ्याने एएफपीला सांगितले की, एकट्या हल्लेखोराने घरांच्या आडून येऊन गोळीबार केला. ते म्हणाले की राजदूत आणि इतर सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत, परंतु आम्ही खबरदारी म्हणून दूतावासाच्या इमारतीच्या बाहेर जात नाही.

पाक पंतप्रधानांची कठोर कारवाईची मागणी

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी तालिबान सरकारला या प्रकरणी कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असे ट्विट पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केले आहे.

पाक पंतप्रधानांनी पुढे लिहिले की, मी त्या सुरक्षा रक्षकाला सलाम करतो, ज्याने राजदूताचा जीव वाचवण्यासाठी स्वत: गोळी खाल्ली. तो लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी माझी मागणी आहे. सध्या काबूलमधील पाकिस्तानी दूतावासातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हल्ल्यानंतर तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.

पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांची अफगाणिस्तानला भेट

पाकिस्तानी दूतावासावर हा हल्ला अशावेळी झाला आहे जेव्हा परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार नुकत्याच अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यांच्या वतीने तालिबान सरकारचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी आणि उपपंतप्रधान अब्दुल सलाम हनाफी यांची भेट घेतली. त्यानंतर आरोग्य, कृषी, गुंतवणूक या विषयांवर गंभीर चर्चा झाली आणि परस्पर सहकार्य वाढवण्यावरही भर देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT