perseverance-rover
perseverance-rover 
ग्लोबल

‘पर्सिव्हरन्स’ची पहिली टेस्ट ड्राईव्ह यशस्वी

पीटीआय

मंगळाच्या पृष्ठभागावर फिरली रोव्हरची चाके, नासाला मोठे यश
लॉसएंजेल्स - मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलेल्या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या पर्सिव्हरन्स या रोव्हरने आज पहिली टेस्ट ड्राईव्ह (चाचणी)  यशस्वीरीत्या पार पाडली. यामध्ये रोव्हरने ६.५ मीटरचे अंतर कापत एक मोठा टप्पा गाठल्याचे संशोधकांनी सांगितले. या चाचणीचा कालावधी साधारणपणे ३३ मिनिटे एवढा होता. यादरम्यान सुरुवातीला हे रोव्हर साधारणपणे चार मीटरने पुढे सरकले नंतर दीडशे अंशांच्या कोनामध्ये ते डावीकडे वळले त्यानंतर त्याने पुन्हा २.५ मीटरने माघार घेत तात्पुरत्या थांब्याच्या ठिकाणी विश्रांती घेतली, असे ‘नासा’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

या रोव्हरची प्रत्येक यंत्रणा, उपप्रणाली आणि उपकरणे योग्यरीत्या काम करत आहेत किंवा नाहीत हे तपासण्यासाठी ही चाचणी घेण्यात आल्याचे नासाने म्हटले आहे. एका मोठ्या मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी रोव्हरने यशस्वीरीत्या पार पाडलेली ही चाचणी खूप मोठे यश असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. दुसऱ्या ग्रहाच्या पृष्ठभागावर एखादे उपकरण ऑपरेट करताना अनेक गोष्टी या नव्याने घडत असतात. पहिल्या चाचणीमध्ये त्यांचे मोजमाप करणे, नोंद ठेवणे खूप गरजेचे असते, असे नासाच्या संशोधक अनायस झारीफियान यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सहाही चाके ॲक्टिव्ह
या रोव्हरच्या चाकांना किक देण्याची आम्हाला मिळालेली ही पहिली संधी होती, त्यातूनच या रोव्हरची चाके फिरतात की नाही हे देखील स्पष्ट झाले. या रोव्हरची सहाही चाके उत्तमरीत्या काम करत आहेत. आता पुढे जाण्यासाठी आमची ड्राईव्ह सिस्टिम तयार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पुढील दोन वर्षे विज्ञान ज्या ठिकाणी आम्हाला घेऊन जाईल तिथे जाऊ शकू, असेही झारीफियान यांनी सांगितले.

मंगळाच्या जीवसृष्टीचा वेध
एकदा वैज्ञानिक संशोधनाला सुरुवात झाल्यानंतर रोव्हरने त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणापासून दोनशे मीटरचा प्रवास करणे अपेक्षित आहे. पुढील संशोधन कार्यात प्राचीन अशा सुक्ष्मजीवांच्या शोधाचाही समावेश असल्याचे नासाने म्हटले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून  नासा मंगळाची जीवसृष्टी आणि भूतकाळातील या ग्रहाच्या तापमानाचा वेध घेणार आहे. यामुळे मंगळाचे वातावरण मानवाला राहण्यास लायक आहे किंवा नाही हे देखील पडताळून पाहण्यात येईल. मंगळाच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकाचे नमुने देखील हे रोव्हर गोळा करणार आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT