Russia diverted attention from Kiev
Russia diverted attention from Kiev  sakal
ग्लोबल

रशियाने किव्हवरुन लक्ष हटविले

सकाळ वृत्तसेवा

किव्ह : युक्रेनवर हल्ला करून आणि राजधानी किव्हभोवती वेढा घालून दीड महिना होत आला तरी या शहराचा अद्यापही ताबा मिळविता न आलेल्या रशियाने दोन्बास या पूर्वेकडील भागाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या भागात रशियाने जोरदार हल्ले सुरु केले असून युक्रेन सरकारनेही दोन्बास, लुहान्स्क आणि खारकिव्ह या भागांमधून नागरिकांना निघून जाण्याचे आवाहन गुरुवारी करण्यात आले.

युक्रेनमधील युद्धाचा आज ४३ वा दिवस होता. राजधानी किव्ह ताब्यात घेण्यास अपयश आल्यानंतर रशियाने या भागातून आपले सैन्य आज माघारी घेतले आहे. हे सैन्य युक्रेनच्या पूर्व आणि आग्नेय भागाकडे हलविण्यात येणार आहे. रशियाच्या ताब्यातील क्रिमियापासून ते रशियासमर्थक बंडखोरांच्या ताब्यातील भागापर्यंतचा संपूर्ण भूभाग ताब्यात घेण्याची तयारी रशियाने सुरु केली आहे. दोन्बास या भागात रशियन भाषा बोलणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या भागावर नियंत्रण मिळविण्यास रशिया प्रयत्नशील असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मारीउपोलमध्ये हजारोंचा मृत्यू

किव्ह : मारीउपोल शहराची रशियाने पूर्णपणे कोंडी केली असून या शहरात जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठाही रोखला आहे. या शहरात रशियाने हजारो नागरिकांना ठार मारले असून ही बाब लपवून ठेवण्यासाठीच कोणालाही येथे प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. ‘रशियाने अत्यंत क्रूरपणे हल्ले करत हजारो जणांना मारले असून हजारो जण जखमी झाले आहेत. हा प्रकार जगापासून लपवून ठेवण्यासाठीच कोणतीही मदतही तिथे पोहोचू दिली जात नाही. मात्र, त्यांना फार काळ हा प्रकार लपवून ठेवता येणार नाही,’ असे झेलेन्स्की म्हणाले. बुका शहरातही त्यांनी अनेक मृतदेह लपवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी शस्त्रे द्या

पूर्व भागावर ताबा मिळविण्यासाठी रशियन सैन्याची जुळवाजुळव सुरु होत असल्याने नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी ‘नाटो’ देशांनी अधिकाधिक शस्त्रे पुरवावीत, असे आवाहन युक्रेनने आज पुन्हा केले आहे. ‘नागरिकांवर रशियाकडून होणारे अत्याचार रोखण्यासाठी आम्हाला शस्त्र, शस्त्र आणि फक्त शस्त्र हवी आहेत. आाम्हाला जितक्या लवकर शस्त्र मिळतील आणि ती युक्रेनच्या सैनिकांच्या हातात पडतील, तितक्या प्रमाणात आम्ही नागरिकांचे जीव वाचवू शकतो,’ असे युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दीमित्रो कुलेबा यांनी ‘नाटो’ला सांगितले. बुका शहरात आढळून आलेल्या मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचेही कुलेबा यांनी सांगितले. काही नाटो सदस्यांनी युक्रेनला रणगाडाविरोधी आणि विमानविरोधी तोफा पाठविल्या आहेत. मात्र, रशियाचे हवाई आक्रमण रोखण्यासाठी युक्रेनला लढाऊ विमानांची आवश्‍यकता असून ती मागणी अद्याप कोणत्याही देशाने पूर्ण केलेली नाही.

दहा ‘ग्रीन कॉरिडॉर’ खुले

लव्हिव : युक्रेनमधील तीन भागांतील नागरिकांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी दहा ग्रीन कॉरिडॉर खुले करण्यास रशियाच्या सैन्याने मान्यता दिली असल्याचे युक्रेन सरकारने आज जाहीर केले. पूर्व भागात मोठी कारवाई करण्याची रशियाची तयारी सुरु असल्याने या भागांतून नागरिकांना बाहेर पडण्यासाठी दोनेत्स्क, लुहान्स्क आणि झॅपोरिझ्झिया या भागातून १० सुरक्षित मार्ग खुले करण्यात आले आहेत.

युद्धाच्या आघाडीवर

  • शस्त्रांच्या मागणीसाठी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री ‘नाटो’च्या मुख्यालयात

  • रशियन सैनिकांकडून नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर झाल्याचा आरोप

  • अनेक शहरांमध्ये रशियाकडून प्रचंड नासधूस, अनेक इमारती जमीनदोस्त

  • रशियाच्या तेलावर पूर्ण बंदी घाला : झेलेन्स्की

  • पाच अब्ज डॉलरचे नुकसान सोसून रशियातून बाहेर पडण्याचा ‘शेल’ कंपनीचा निर्णय

  • युक्रेनमधील चार तेल साठ्यांवर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT