sri lanka latest news 
ग्लोबल

श्रीलंका : राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी आंदोलकांना आढळली दीड कोटींची रक्कम

श्रीलंकन पोलिसांनी देशातील ढासळती कायदा सुव्यवस्था पाहून अनेक प्रांतात संचारबंदी लागू केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

श्रीलंकन पोलिसांनी देशातील ढासळती कायदा सुव्यवस्था पाहून अनेक प्रांतात संचारबंदी लागू केली आहे.

मागील काही दिवसांपासून महागाईने आणि टंचाईने जनता होरपळली असल्यानं नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, आता श्रीलंकेत मोठी अनागोंदीची स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या सातत्यानं रोषापुढं पंतप्रधान रनील विक्रमसिंगे यांना अखेर नमतं घेतलं असून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

श्रीलंकेतील आर्थिक व राजकीय संकटाचा विरोध करणाऱ्या आंदोलकांनी शनिवारी पंतप्रधानांचे (prime minister) खासगी निवासस्थान पेटवून दिले. पोलिसांवर हे घर पेटवून दिल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. श्रीलंकन पोलिसांनी देशातील ढासळती कायदा सुव्यवस्था पाहून अनेक प्रांतात संचारबंदी लागू केली आहे. चीफ ऑफ डिफेंस स्टाफ यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.

दरम्यान, या गोंधळात आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. श्रीलंकेला कर्जाच्या खाईत आणि आर्थिक संकटात लोटून पोबारा केलेले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांचे अधिकृत निवासस्थान जनाधिपती मंदिरय्या मधून आंदोलकांना तब्बल दीड कोटी रुपयांची रोख रक्कम आढळली आहे. या रकमेची लूट न करता आंदोलकांनी ही रक्कम तेथील सुरक्षारक्षकांकडे सोपवली आहे. जनतेचे लुटलेले पैसे जनतेला परत मिळावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात प्रवेश केल्यानंतर आंदोलकांनी तेथील या विविध खोल्यांचा ताबा घेतला आहे. तिथल्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेतला. जनतेला वीज टंचाईचा सामना करायला लागतो. पण राजेप्रसादातले एसी चालू होते. काही लोकांनी ते एसी फोडून टाकले. त्याचवेळी एका दालनामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची रोख रक्कम आढळली आहे.

श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळं सर्वत्र अनागोंदी निर्माण झाली आहे. संतप्त नागरिकांनी राष्ट्रपती भवनाचाही ताबा घेतला असून त्याठिकाणी नासधूस आणि तोडफोड केली आहे. काही आंदोलकांनी तर पंतप्रधान रनील विक्रमसिंगे यांच्या खासगी घरावर हल्ला केला असून तिथंही प्रचंड तोडफोड करत हे निवासस्थान पेटवून दिलं आहे. पंतप्रधानांचं निवासस्थान पेटतानाचे व्हिडिओही समोर आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT