ShriLanka: आंदोलकांचा राष्ट्रपती भवनात बिअर-जेवणावर ताव, स्विमिंग पूलमध्ये उड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ShriLanka

ShriLanka: आंदोलकांचा राष्ट्रपती भवनात बिअर-जेवणावर ताव, स्विमिंग पूलमध्ये उड्या

कोलंबो : श्रीलंकेतील महागाईवरून तेथील नागरिक आक्रमक झाले असून नागरिकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला आहे. दरम्यान आंदोलकांची संख्या आणि आक्रमकता पाहून राष्ट्रपती राजपक्षे यांनी राष्ट्रपती भवनातून पलायन केलं आहे. तर आंदोलकांनी राष्ट्रपती भवनातील संपत्तीची तोडफोड केल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. तर काही नागरिक स्विमिंग पूलमध्ये उड्या मारत दिसत आहेत. (Shri Lanka Crisis Updates)

हेही वाचा: राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला आंदोलकांचा वेढा; स्वत:ची सुटका करुन राजपक्षेंनी काढला पळ

दरम्यान, श्रीलंकेत गगनाला भिडलेल्या महागाईच्या काळात इंधनाअभावी जनतेचा संताप पहायला मिळतोय. देशात शांतता-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि निदर्शनं नियंत्रणात ठेवण्यासाठी शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून पश्चिम प्रांतातील अनेक पोलीस (Police) विभागात कर्फ्यू लागू करण्यात आला होता. कर्फ्यूचं उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनानं दिला आहे पण आक्रमक आंदोलकांनी राष्ट्रपती भवनात प्रवेश करून तेथील जेवनावर आणि बिअरवर ताव मारला आहे.

श्रीलंकेचे पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. तर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपती भवनातून पलायन केलं आहे. त्यामुळे तेथील नागरिक जास्तच आक्रमक झाले आहेत. या घटनेचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये नागरिकांचा जमाव राष्ट्रपती भवनात घुसताना पाहायला मिळत आहे तर एका व्हिडिओमध्ये काही लोक तेथील स्विमिंग पूलमध्ये पोहताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये लोक राष्ट्रपती भवनातील जेवनावर आणि बिअरवर ताव मारताना दिसत आहेत.

Web Title: Shrilanka Crisis People Swimming Pool Kitchen Beer President Rajpakshe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :global news
go to top