श्रीलंकेत भडका! आंदोलकांनी पेटवलं PM विक्रमसिंगेंचं खासगी निवासस्थान

राष्ट्रपती गाताबाया राजेपक्षे हे देखील पळून गेल्याचं सांगितलं जात आहे.
Shri Lanka_Ranil Vikramsinghe
Shri Lanka_Ranil Vikramsinghe

कोलंबो : श्रीलंकेत सध्या मोठी अनागोंदीची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांच्या सातत्यानं रोषापुढं पंतप्रधान रनील विक्रमसिंगे यांना अखेर नमतं घेतलं असून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्या नागरिकांनी अक्षऱशः त्याचं खासगी निवासस्थानही पेटवून दिलं आहे. (Outbreak in Sri Lanka Protesters set fire to PM Vikram Singh private residence)

श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळं सर्वत्र अनागोंदी निर्माण झाली आहे. संतप्त नागरिकांनी राष्ट्रपती भवनाचाही ताबा घेतला असून त्याठिकाणी नासधूस आणि तोडफोड सुरु केली आहे. राष्ट्रपती भवनातील खाद्यपदार्थ, बिअर यांच्यावर अनेक आंदोलक ताव मारतानाचे तसेच या भवनाच्या आवारातील स्विमिंग पूलमध्ये खेळतानाचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत.

Shri Lanka_Ranil Vikramsinghe
अबू सालेमची शिक्षा कायम राहणार की वाढणार? ११ जुलैला फैसला

काही आंदोलकांनी तर पंतप्रधान रनील विक्रमसिंगे यांच्या खासगी घरावर हल्ला केला असून तिथंही प्रचंड तोडफोड करत हे निवासस्थान पेटवून दिलं आहे. पंतप्रधानांचं निवासस्थान पेटतानाचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत.

Shri Lanka_Ranil Vikramsinghe
CM शिंदेंच्या हस्तेच होणार आषाढीची महापूजा, ECची सशर्त परवानगी

दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्रपती गाताबाया राजेपक्षे यांनी आपलं निवासस्थान सोडलं असून ते पळून गेल्याचं सांगितलं जात आहे. राजधानी कोलंबो शहराच्या पूर्वेला असलेल्या जापना शहरात ते लपून बसल्याचंही सांगण्यात येत आहे. जोपर्यंत नवी राजकीय व्यवस्था अस्तित्वात येत नाही तोपर्यंत श्रीलंकेतील परिस्थिती कायम राहणार असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com