ANI
ग्लोबल

कार अपघातात दोघांचा मृत्यू; पोलिस म्हणतात, ड्रायव्हर नव्हता

सकाळ डिजिटल टीम

कार एका झाडाला जाऊन धडकली. यानंतर कारला आग लागली. यावेळी कारमध्ये असलेल्या दोघांचा मृत्यू झाला.

वॉशिंग्टन - अमेरिकेतील हॉस्टनमध्ये टेस्लाच्या कारचा अपघात झाला. ड्रायव्हरलेस कार एका झाडाला जाऊन धडकली. यानंतर कारला आग लागली. यावेळी कारमध्ये असलेल्या दोघांचा मृत्यू झाला. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी ड्रायव्हर सीटवर कोणीही बसले नव्हते. तर ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर एक व्यक्ती बसली होती. दुसरी व्यक्ती मागच्या सीटवर होती. गाडीला आग लागल्यानंतर त्यात अडकल्यानं दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समजते.

हॉस्टनच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अपघातावेळी कारचा वेग जास्त होता. अपघातग्रस्त कार ही 2019 मॉडेल एस होती. शनिवारी हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रायव्हरलेस कारचं एका वळणावर निंयंत्रण सुटलं आणि अपघात झाला. अपघातानंतर कारला आग लागली. पूर्ण आग विझल्यानंतरं दोन्ही मृतदेह कारमधून बाहेर काढण्यात आले.

हॉस्टनमधील अपघातामुले ड्रायव्हरलेस कारबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही कार सेमी ऑटोमेटेड होती. याच्या ड्रायव्हिंग सिस्टिमबाबत शंका व्यक्त केली जातेय. टेस्ला सध्या फुल सेल्फ ड्रायव्हिंग सॉफ्टवेअरसह कार लाँच करण्याची तयारी करत आहे. रिपोर्टनुसार गेल्या काही दिवसात 25 हून अधिक गाड्यांचा अपघात झाला आहे. यानंतर अमेरिकेच्या ऑटो सेफ्टी एजन्सीने टेस्लाच्या गाड्यांची तपासणी सुरु केली आहे.

ड्रायव्हरलेस कारच्या अपघाताबाबत अद्याप टेस्लाकडून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. ट्विटरवर सक्रिय असणारे टेस्लाचे मालक अॅलन मस्क यांनीही यावर मौन बाळगले आहे. मस्क यांनी जानेवारीतच म्हटलं होतं की, या वर्षाच्या शेवटी फुल ड्राइव्ह कार येईल. मस्क यांची टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक कार तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या टेस्ला ड्रायव्हरलेस कारही तयार करते. चालकाशिवाय ही कार धावू शकते. मात्र तंत्रज्ञानातील दोष समोर येत असून पूर्णपणे टेक्नॉलॉजीवर विश्वास कसा ठेवायाच असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT