Volodymyr Zelensky allegation on Russia reluctant to discuss communication With american industrialists
Volodymyr Zelensky allegation on Russia reluctant to discuss communication With american industrialists  sakal
ग्लोबल

चर्चा करण्यास रशिया अनुत्सुक; झेलेन्स्की यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

किव्ह : ‘आपण खूपच शक्तीमान आहोत, असा रशियाचा समज असल्याने आमच्याबरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा करण्याची त्यांची इच्छा नाही,’ असा दावा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी आज केला. झेलेन्स्की यांनी आज व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून अमेरिकेतील उद्योगपतींबरोबर संवाद साधला. झेलेन्स्की म्हणाले की,‘‘शांतता चर्चेमध्ये रशिया सहभागी होण्याची सध्या अजिबात शक्यता नाही. कारण रशियाला आपल्या सामर्थ्याचा अंदाज असून त्यांना आपण खूपच शक्तीमान असल्यासारखे वाटते. त्यामुळे आपण रशियाचे हे सामर्थ्य कमी करण्याची गरज आहे. हे करण्यासाठी जगाने प्राधान्य द्यायला हवे.’’

युद्धभूमीवर रशियाचा प्रखर सामना करण्याचे काम युक्रेनी सैनिक करत असून आता आमच्या बाजूने असणाऱ्या देशांनी रशियावर आणखी कठोर निर्बंध लादण्याची गरज आहे, असे आवाहन झेलेन्स्की यांनी केले.

युद्धाच्या आघाडीवर

  • मारिउपोलमध्ये एका इमारतीखाली शंभराहून अधिक मृतदेह आढळले

  • युक्रेनच्या पुनर्बांधणीला हातभार लावणार : उद्योगपती वॉरेन बफेट

  • रशियाची अर्थव्यवस्था १५ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज

  • पूर्व भागात तीव्र संघर्ष सुरुच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT