what in naked men hadaka matsuri festival in japan celebrated for last time due to population crisis marathi news
what in naked men hadaka matsuri festival in japan celebrated for last time due to population crisis marathi news  Esakal
ग्लोबल

Naked Men Festival : नेकेड फेस्टिवल...कपड्यांविना मंदिरात जमतात हजारो पुरुष, नेमकं काय आहे कारण?

रोहित कणसे

Naked Men Festival in Japan : आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कपड्यांना विशेष महत्व आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातील लोक त्यांच्या उत्सवांदरम्यान वेगवेगळी वेशभूषा करतात. दरम्यान जपानमध्ये एक असा सण साजरा केला जातो जेथे हजारोंच्या संख्येने पुरूष कपड्यांविना एका मंदिरात गोळा होतात. हा सण हाडीका-मात्सुरी फेस्टिवल म्हणून ओळखला जातो.

ऐन थंडीच्या दिवसात या फेस्टिवलमध्ये सहभागी होणारे हजारो लोक पाण्यातून जातात, या उत्सवादरम्यान असे करणे पवित्र मानले जातो. हाडीका-मात्सुरी दरवर्षी फेब्रुवारी मध्ये साजरा केला जातो. यावर्षी देखील हा सण अखेरचा साजरा करण्यात आला. कारण जपानमध्ये सध्या तरुणांची सख्या वेगाने कमी होत आहे. त्यामुळे हा सण साजरा करण्याच्या जबाबदारी वृद्धांवर येऊन पडली आहे.

कसा असतो हा फेस्टिवल?

या उत्सवाला नेकेड मेन फेस्टिवल (Naked Men Festival) देखील म्हटले जाते. या सोहळ्यात सहभागी होणारे पुरुष फक्त लंगोट घातलेले असतात आणि तो दक्षिण जपानच्या होन्शू बेटावर साजरा केला जातो. या बेटावर सैदाइजी केनोनिन मंदिर (Saidaiji Kannonin Temple) आहे. या उत्सवाच्या सुरूवातील महिला नृत्य होतात. तसेच संध्याकाली लोक मंदिराभोवती प्रदक्षिणा घालातात. तर रात्री पुजारी मंदिराच्या खिडकीतून लोकांवर एक फांद्याचे बंडल आणि काठी फेकतात. ज्याच्या हाती हे लागेल त्याच्यासाठी हे वर्ष शुभ जातं अशी मान्यता आहे. या उत्सवात एका स्थानिक व्यक्तीला शिन-ओटोको म्हणजेच गॉड मॅन म्हणून निवडले जाते.

मंदिरात आलेल्या लोकांना या गॉड मॅनला स्पर्श करायचा असतो. मात्र यंदा हा हजारो वर्षांपासून सुरू असलेला हा उत्सव शेवटचा साजरा करण्यात आला. यासाठी हजारो लोक येथे दाखल झाले होते. जापानची लोकसंख्या वेगाने कमी होत आहे, ज्यामुळे तरुणांची संख्या देखील कमी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT