scot morrison 
ग्लोबल

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत महिलेसोबत दुष्कर्म; पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मागितली माफी

सकाळवृत्तसेवा

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या संसदेत एका महिलेसोबत दुष्कर्म घडल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी या महिलेची माफी मागितली आहे. तसेच याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या महिलेने आरोप केला आहे की, संसद परिसरातच तिच्यासोबत दुष्कर्म केले गेले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचं म्हणणं आहे की, या प्रकरणानंतर देशाच्या वर्क कल्चरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली जाईल. या महिलेचं म्हणणं आहे की, सरंक्षण मंत्री लिंडा रेनॉल्ड्स यांच्या ऑफिसमध्ये मार्च 2019 मध्ये तिच्यासोबत दुष्कर्म केलं गेलं होतं. 

याशिवाय या महिलेचं हे देखील म्हणणं आहे की, आरोपी हा पंतप्रधान मॉरिसन यांच्या सत्ताधारी लिबरल पार्टीशी निगडीत आहे. महिलेने सांगितलं की तिने एप्रिल 2019 मध्ये पोलिसांना यासंबंधात माहिती दिली होती. मात्र आता आपल्या करिअरला धोक्यात टाकत तिने या प्रकरणाची औपचारिक तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलेने म्हटलंय की, तिने रेनॉल्ड्स यांच्या ऑफिसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतीत सांगितलं होतं. मात्र त्यानंतर देखील त्यांना त्याच ऑफिसमधील बैठकीत सामील होण्यासाठी सांगितलं गेलं. सोमवारी संरक्षण मंत्री लिंडा रेनॉल्ड्स यांनी सांगितलं की महिलेने त्यांना तिच्यासोबत झालेल्या अपप्रकाराची माहिती दिली होती. 

मात्र, या महिलेवर औपचारिक तक्रार करु नये, असा दबाव होता या गोष्टीशी त्यांनी असहमती दर्शवली आहे. मात्र, आता आज मंगळवारी थेट पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीच या महिलेची माफी मागत संपूर्ण प्रकरणाची योग्यरितीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की, असं व्हायला नको होतं. मी यासाठी माफी मागतो. यासोबतच त्यांनी असंही म्हटलं की, मी हे वचन देतो की वर्कप्लेसवर महिलांना संपूर्णपणे संरक्षण दिले जाईल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT