अभिमानास्पद : 200 भारतीय 15 देशांमध्ये उच्चपदस्थ; 60 जण विविध देशांच्या सरकारांमध्ये

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

अमेरिका आणि ब्रिटनसहित जगभरातील 15 देशांमध्ये भारतीय वंशाचे 200 हून अधिक लोक आघाडीच्या नेतृत्वपदावर कार्यरत आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिका आणि ब्रिटनसहित जगभरातील 15 देशांमध्ये भारतीय वंशाचे 200 हून अधिक लोक आघाडीच्या नेतृत्वपदावर कार्यरत आहेत. इतकंच नाही तर यातील 60 लोकांनी विविध देशांच्या मंत्रीमंडळात देखील आपलं स्थान निर्माण केलं आहे. '2021 इंडियास्पोरा गव्हर्मेंट लीडर्स'च्या पहिल्या यादीत याबाबतची माहिती दिली गेली आहे. सरकारी वेबसाईट्स आणि सार्वजनिक रित्या उपलब्ध असणाऱ्या इतर माहितीच्या आधारावर ही यादी तयार केली  गेली आहे.

15 देशांमध्ये भारतीय व्यक्ती उच्चपदस्थ
या यादीमध्ये सांगितलं गेलंय की भारतीय वंशाचे 200 हून अधिक नेते जगभरातील 15 देशांमध्ये लोकसेवेच्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. यातील 60 हून अधिक लोक मंत्रीमंडळामध्ये पदभार सांभाळत आहेत. 'इंडियास्पोरा'चे संस्थापक, उद्योगपती आणि गुंतवणूकदार एम. आर. रंगास्वामी यांनी म्हटलंय की ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. जगातील सर्वांत जुन्या लोकशाही देशाची पहिली महिला उपराष्ट्राध्यक्षा ही भारतीय वंशाची आहे. 

हेही वाचा - जी७ देशांशी बायडेन करणार चर्चा

अमेरिकेचे खासदार असणाऱ्या अमी बेरा यांनी म्हटलं की, '2021 इंडियास्पोरा गव्हर्मेंट लीडर्स' च्या यादीत सामील होणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहेय संसदेत मोठ्या काळापासून मी सेवा देत आहे. मला भारतीय-अमेरिकन समुदायाची नेता म्हणून गर्व वाटतो. हा भारतीय समुदाय आता अमेरिकन समाजाचा एक अभिन्न असा अंग बनला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indiaspora 200 indian origin persons occupy leadership positions in 15 nations