Sakal - 2021-03-09T160326.608.jpg
Sakal - 2021-03-09T160326.608.jpg 
health-fitness-wellness

सौंदर्य अन् आरोग्यासाठी फक्त "एक चुटकी केशर"! फायदे वाचून व्हाल थक्क

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केशरचा उपयोग आपण खरे तर पदार्थाला सुवास देण्यासाठी आणि पदार्थाना रंग येण्यासाठी केला जातो. पण खास पदार्थांचा रंग आणि स्वाद वाढविण्याशिवाय केशराचा उपयोग त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठीही केला जातो. त्वचेचा रंग उजळवण्यासाठी त्याचप्रमाणे सतेज करण्यासाठी केशराचा वापर करण्यात येतो. त्याचप्रमाणे गरोदर महिलांना बाळाची त्वचा चांगली व्हावी म्हणून दूधातीन केशर दिलं जातं. केशराच्या अनेक सौंदर्यवर्धक फायद्यांसोबतच आरोग्यदायी फायदेही आहेत. त्वचेवरील डाग घालवून त्वचा सुंदर बनविण्यासाठी केशराचा उपयोग प्राचीन काळापासून चालत आला आहे. केशराचे त्वचेसाठी असणारे फायदे अनेक आहेत. तसेच केशर हे अनेक आजारांवर फायदेशीरही आहे.जाणून घेऊयात आरोग्यदायी फायद्यांबाबत...

कोलेस्ट्रॉल कमी करते
"शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे डोळ्यांचा रॅटीना खराब होण्याचा धोका असतो. केशरामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म असतात. तसेच डोळ्यांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठीही केशर उपयोगी ठरते. केशर रक्तातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते आणि वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. 

स्मरणशक्तीवरही फायदेशीर

"स्मरणशक्तीवरही केशर फायदेशीर ठरतं. अल्झायमरसारख्या आजार दूर ठेवण्यासाठी केशर हा नैसर्गिक उपाय आहे. "    

ट्यूमरपासून सुटका

ट्यूमरपासून सुटका करण्यासाठीही केशर फायदेशीर ठरते. केशराचे सेवन केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. किमोथेरपीमुळे होणारे साइड इफेक्ट्स म्हणजे वजन कमी होणं, हिमोग्लोबिनची पातळी कमी जास्त होणं यावर उपाय म्हणून केशरचा फायदा होतो.

पोटाच्या तक्रारींपासून सुटका

केशराचे नियमित सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन ए चे प्रमाण वाढतं.एक ग्लास पाण्यामध्ये मध आणि केशर एकत्र करून प्यायल्याने पोटाच्या तक्रारींपासून सुटका होते. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT