sakal (98).jpg
sakal (98).jpg 
health-fitness-wellness

कंबरेच्या दुखण्यात लाभदायी 'कटिचक्रासन'; २० मिनिटाच्या आसनाचे फायदे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कंबरेचं दुखणं, स्लिप डिस्क आणि सायटिकाच्या दुखणं आपल्याला त्रास देतात. तर योगाचे एक असे आसन आहे ज्यामुळे आपल्याला आराम मिळू शकतो. या आसनामुळे विशेष करून फायदा होऊ शकतो. कंबर दुखण्यामुळे शरीरामध्ये आलेलं आखडलेपणा दूर होतो. जांघ, पार्श्वभाग, पाठीचा कणा आणि कंबर यात आलेला अवघडपणा दूर करून त्यांना मजबूत बनवतं. कंबरेची अतिरिक्त चरबी घालवून कंबरेचा आकार कमी करून ती आकर्षक बनवण्यास मदत होते. किडनी, यकृत, आतडी, स्वादुपिंड, मूत्राशय या सर्व गोष्टींवर दाब येतो, तसंच त्या खेचल्या जात असल्यानं त्यांचं कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, लठ्ठपणा या विकारांमध्येही उपयुक्त आहे. आणि ते आसन म्हणजे लाभदायी 'कटिचक्रासन'

'कटिचक्रासन' कसे करावे?
एक-एक करून दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा. या क्रियेत दोन्ही गुडघे एकमेकांना चिकटलेले राहतील. आता दोन्ही हात खांद्यांना समांतर असे ठेवा. हाताचे तळवे वरच्या बाजूला राहतील. आता श्वास सोडत दोन्ही गुडघे एकत्र डाव्या बाजूच्या जमिनीच्या दिशेनं घेऊन जा. त्याचबरोबर डोकं उजव्या बाजूला फिरवा. गुडघे जितक्या सहजपणे जमिनीपर्यंत घेऊन जाऊ शकता तेवढं घेऊन जा. घोट्यावर घोटा आणि गुडघ्यावर गुडघा येईल. आता श्वासोच्छ्वास सामान्य ठेवून काही वेळ या स्थितीमध्ये थांबा. जितका वेळ शक्य आहे तितका वेळ थांबल्यानंतर एक एक गुडघा उचला. डोकंही सरळ करा. अशा प्रकारे दुसऱ्या बाजूलाही करा. दोन्ही पायांत थोडं अंतर ठेवूनही हे आसन करता येऊ शकतं. दोन्ही बाजूंनी तीन-तीन वेळा ही क्रिया करा.

काळजी घेणे आवश्यक

योगगुरू म्हणतात, कोणत्याही प्रकारची घाई किंवा जबरदस्ती न करता पायांना जमिनीच्या दिशेनं हळूहळू घेऊन जा. पण पूर्वस्थितीला येताना एक-एक करून गुडघे वर उचला. कारण एकाच वेळी दोन्ही गुडघे उचलायला गेलात तर त्यामुळे कंबरेवर थोडा जास्त जोर येण्याची शक्यता असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT