योगा लाइफस्टाइल : अष्टांग नमस्कार
योगा लाइफस्टाइल : अष्टांग नमस्कार sakal
health-fitness-wellness

योगा लाइफस्टाइल : अष्टांग नमस्कार

वसुंधरा तलवारे

वाचकांनो, सूर्यनमस्काराच्या आसन साखळीतील आतापर्यंत सांगितलेल्या आसनांचा तुम्ही सराव करत असालच. मागच्या भागात आपण पर्वतासनाचा अभ्यास केला, या वेळी त्यापुढील आसन स्थिती असलेल्या अष्टांग नमस्कार या आसनाची माहिती घेणार आहोत. याच्या नावातच संपूर्ण अर्थ आहे, म्हणजे हातापायासह आठ अंगाचा नमस्कार. संस्कृतमधील ‘अष्टांग’ शब्दाला मराठीत आठ अंग आणि त्या आधाराने घातलेला नमस्कार म्हणजे अष्टांग नमस्कार होय. यामध्ये हनुवटी, छाती, दोन्ही हात, गुडघे आणि दोन बोटे जमिनीला टेकवून नमस्कार स्थितीत राहतो. शक्य असेल तितका वेळ या अष्टांगाच्या मदतीने तुम्ही आसनस्थितीत स्थिर राहू शकता.

असे करा आसन...

  • पर्वतासनातील स्थितीप्रमाणे हात आणि पाय आहे त्या ठिकाणी ठेवणे.

  • श्वास बाहेर सोडून ती स्थिती कायम ठेवत गुडघे, छाती आणि हनुवटी जमिनीला टेकवा. पाय बोटांपर्यंत येतील. या स्थितीत बाह्यकुंभक म्हणजे सन्यक प्राणायाम करा.

  • अंतिम स्थितीत पायाची बोटे, गुडघे, हात आणि हनुवटी जमिनीला स्पर्श करतील. गुडघे, छाती आणि हनुवटी एकाचवेळी जमिनीला स्पर्श करतील, याची दक्षता घ्या. समजा हे शक्य नसल्यास आधी गुडघे, नंतर छाती व शेवटी हनुवटी टेकवा.

  • पार्श्‍वभाग आणि उदर उंचवावे.

  • मागच्या भागात निर्माण झालेल्या कमानीच्या आणि ओटीपोटाच्या भागावर लक्ष केंद्रित करा.

  • मणिपूर चक्रावर लक्ष द्या.

  • ‘ओम पुष्पेन नमः’ या मंत्राचा उच्चार करावा.

सूर्यनमस्कार आसनांची मालिका काहीशा फरकानेही करता येते. आपण या आसनस्थितीत सम्यक प्राणायाम करत आहोत. त्याचबरोबर अंतर कुंभक प्राणायामही तुम्ही करू शकता. आसनस्थिती पाचमध्ये श्वास घेत असतानाच आपला कुंभक लागलेला असतो. आताच्या सहाव्या स्थितीत म्हणजे अष्टांग नमस्कारात श्वास सोडत आठ अवयवांच्या स्थितीवर लक्ष द्यावे.

कोणी करू नये...

पाठीचा त्रास, उच्च रक्तदाब असलेल्यांनी हे आसन करू नये.

आसनाचे फायदे...

  • पाय, हाताचे आणि पाठीचे स्नायू बळकट होतात.

  • छातीची कार्यक्षमता वाढते.

  • खांदा आणि मणक्याचा व्यायाम होतो, बोटे ताणली जातात.

  • पाठीच्या कण्याची कार्यक्षमता सुधारते.

  • हात आणि तळहात तसेच पार्श्वभाग बळकट होतात.

  • योग्य पद्धतीने आसन केल्यास ओटीपोटाचे कार्य सुधारते. त्याचबरोबर भविष्यात निर्माण होणाऱ्या पाठदुखीस प्रतिबंध होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT