Health Tips esakal
आरोग्य

Health Tips: पायाला सतत मुंग्या का येतात? तुम्ही या आजाराला निमंत्रण तर देत नाहीये; वाचा सविस्तर

पायाला सतत मुंग्याला येण्याला ही पाच कारणं जबाबदार असू शकतात. जाणून घेऊया सविस्तर

सकाळ ऑनलाईन टीम

Health Tips: बऱ्याचदा आपण सतत एकाच पोजिशनमध्ये बसलो की आपल्या पायाला मुंग्या येतात. हल्ली वर्क फ्रॉम होम झाल्याने तसेच ऑफिसमध्येही सगळी कामे पीसीवर एकाच जागी असल्याने लगेच त्या पोजिशनमधून उठल्यानंतर आपले पाय सुन्न होतात. पायाला मुंग्या येतात. मात्र पायाला सतत मुंग्याला येण्याला ही पाच कारणं जबाबदार असू शकतात. जाणून घेऊया सविस्तर.

१. व्हिटॅमिनची कमतरता

जर तुमच्या हाताला आणि पायला मुंग्या येत असतील तर तुमच्यात व्हिटॅमिन B-12 ची कमतरता असू शकते. त्याची कमतरता असल्याने तुम्हाला थकलेले वाटेल. तसेच तुम्हाला आळस देखील येईल.

२. कार्पल टनेल सिंड्रोम (Carpal Tunnel Syndrome)

खूप वेळ टायपिंग केल्याने तुमच्या मनगटाच्या नसा आकुंचित होतात. त्यामुळे तुमच्या हाताला मुंग्यादेखील येतात. फिजिओथेरपी आणि व्यायामाने या सिंड्रोमचा त्रास दूग होण्यास मदत होते. (Disease)

३. मानेची नस लागणे

मानेची नस लागल्याने पाठीपासून पायापर्यंत किंवा मानेपासून हातापर्यंतच्या भागात मुंग्या येतात किंवा तो भाग दुखतो. चुकीच्या पद्धतीत बसल्यामुळे किंवा एखाद्या दुखापतीमुळे मानेची नस अकडते.

४. मधुमेह

रक्तातील अतिरिक्त साखरेचे प्रमाण शरीरातील नसांसाठी विषारी ठरते. त्यामुळे हातापायाला मुंग्या येतात. मुंग्या येण्याबरोबरच तुम्हाला खूप भूक किंवा तहान लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

५. हायपरथायरॉईसम

थायरॉईड ग्रंथी निष्क्रीय असल्यास थकवा जाणवू लागतो, वजन वाढू लागते. त्याचबरोबर हातपायाला मुंग्या येतात. म्हणून हायपरथायरॉईसम आहे की नाही हे पाहण्यासाठी ब्लड टेस्ट करून घेणे योग्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बॉलिवूड गाजवलेल्या 'या' अभिनेत्रीच्या पालक आणि भावाची नातेवाईकांनीच केलेली हत्या ! हालअपेष्टांनी वेढलेलं आयुष्य

Ambad News: अंबडमध्ये दुमजली इमारत कोसळली; दोनजण जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

Pune Crime : फटाके वाजवण्यावरून वाद; हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

Rohit Sharma - Virat Kohli: 'थँक यू ऑस्ट्रेलिया! परत येऊ की नाही माहित नाही, पण...', सिडनीतील विजयानंतर विराट-रोहित झाले व्यक्त

Crime: आई आणि काकाला नको त्या अवस्थेत पाहिलं; लेकाचा पारा चढला, रागाच्या भरात भलतंच घडलं

SCROLL FOR NEXT