‘एक्साईज’ची मोठी कारवाई! बनावट विदेशी दारू विकणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद! म्होरक्या बीड जिल्ह्यातील ‘या’ गावचा; लातूर, सोलापूरचेही कनेक्शन, वाचा...

गोवा बनावटीची दारू अवैधपणे महाराष्ट्रात आणून त्याला महाराष्ट्रात सर्वाधिक खपणाऱ्या ब्रॅण्डचे बनावट लेबल लावून विकणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली आहे.
State Excise Department

State Excise Department

sakal solapur

Updated on

सोलापूर : गोवा बनावटीची दारू अवैधपणे महाराष्ट्रात आणून त्याला महाराष्ट्रात सर्वाधिक खपणाऱ्या ब्रॅण्डचे बनावट लेबल लावून विकणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली आहे.

सोलापूर शहरातील मुस्लिम पाच्छा पेठेतील समिर रशीद अंबिलखिचडे व फक्रोद्दीननगर झोपडपट्टीतील आसिम कासिम बल्लारी यांच्याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांना सापळा रचून पथकाने पकडले. त्यावेळी त्यांच्याकडे विविध विदेशी दारूच्या ब्रॅंण्डचे लेबल सापडले. त्यांच्याकडे तपास केल्यानंतर त्या लेबलचे प्रिंट व कटिंग करून देणारा प्रकाश विठ्ठल चन्ना (रा. शनिवार पेठ, सोलापूर) यालाही पथकाने पकडले. त्याची मशिन, लॅमिनेशन पेपर असे साहित्य जप्त केले.

अधिक तपास केल्यावर महाराष्ट्रातील मद्याच्या विविध ब्रॅण्डचे हुबेहुब लेबल व त्याची डिझाईन तयार करणारे सोमनाथ बाळासाहेब कदम, सुलतान महेबूबपाशा शेख (दोघेही रा. लातूर) यांनाही अटक करण्यात आली. लातूरमध्ये त्यांचाही प्रिंटिंगचा व्यवसाय असल्याचे समोर आले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटकेतील संशयितांकडे कसून चौकशी केली. त्यावेळी यातील मुख्य सूत्रधार तथा म्होरक्या महेश बाळासाहेब स्वामी, गोविंद लक्ष्मण काळे (दोघही रा. केज, जि. बीड) यांना बनावट लेबल, गोवा बनावटीचे विदेशी मद्य व वाहनासह पकडण्यात आले.

बनावट दारूचा चालायचा असा व्यवसाय...

बीड जिल्ह्यातील केज येथील महेश स्वामी व गोविंद काळे हे बनावट दारू विक्रीचे सूत्रधार होते. ते गोवा बनावटीचे मद्य अवैधपणे वाहतूक करून महाराष्ट्रात आणायचे. त्यावर महाराष्ट्रनिर्मित ब्रॅंण्डचे बनावट लेबल छपाई करून घ्यायचे. ते लेबल लावून त्या बाटल्या अवैधपणे विक्री करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com