Diabetes आणि वय
Diabetes आणि वय Esakal
आरोग्य

Diabetes या वयामध्ये होण्याचा धोका जास्त! योग्य वयात आरोग्याची घ्या काळजी

Kirti Wadkar

Diabetes ही सध्याच्या काळातील एक वाढत जाणारी समस्या आहे. हा एक असा आजार आहे ज्यावर अद्याप उपचार किंवा औषधं उपलब्ध नसल्याने केवळ योग्य ती काळजी घेणं आणि जीवनमान Life आणि आहारामध्ये चांगले बदल घडवणं गरजेचं ठरतं.

मधुमेहामुळे Diabetes आरोग्याच्या इतरही अनेक समस्या निर्माण होतात. Marathi Health Tips know the relation between your age and Diabetes

त्यामुळेत जर मधुमेही रुग्णांनी योग्य ती काळजी न घेतल्यास एखाद्या गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो.

Diabetes हा अनुंवाशिक किंवा खाण्या-पिण्याच्या सवयी, अपुरी किंवा जास्त झोप, ताण, धुम्रपान अशा अनेक जीवनशैलीशी निगडीत कारणांमुळे होवू शकतो.

मधुमेह आजारामध्ये शरीरात आवश्यक प्रमाणात इनश्युलिनची निर्मिती होत नसल्याने रक्तातील साखरेचं पचन न झाल्याने ब्लड शुगर वाढू लागते.

ही रक्तातील साखर शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहचते. परिणामी किडनी Kidney, हृदय, डोळे, पचनसंस्था यांच्या कार्यप्रणालीवर परिणाम होवून त्यात बिघाड निर्माण होवू शकतो. खास करून वयाच्या काही ठराविक टप्प्यांमध्ये मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे या वयात आरोग्याची योग्य काळजी घेणं गरजेचं असतं.

या वयामध्ये मधुमेह होण्याचा धोका जास्त

अमेरिकेतील National Library of Medicine journal या मासिकामध्ये प्रकाशीत झालेल्या एका शोधअभ्यासात वयाच्या ४०व्या वर्षी मधुमेहाचा धोका अधिक असल्याचं म्हंटलं आहे. ४० वयोगटातील व्यक्तींना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असून पुढे ही समस्या अधिक वाढत जाते आणि उतार वयात तर शुगर कंट्रोल करणं अधिक बिकट होतं असं या लेखात सांगण्यात आलंय.

अमेरिकन डायबेटिस असोशिएशनच्या मते ६०-७५ वयोगटातील व्यक्तींमध्ये देखील मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. तसं पाहता अलिकडे लहान मुलं आणि तरुणांमध्ये देखील मधुमेह होण्याचं प्रमाणा वाढलं आहे. मात्र ४० वयोगटातील व्यक्तींमध्ये हा धोका जास्त असतो.

हे देखिल वाचा-

वय आणि मधुमेहाचा संबध

अभ्यासानुसार ३०-४० वयोगटातील व्यक्ती या त्यांच्या आरोग्यापेक्षा इतर गोष्टींकडे जास्त लक्ष देतात. यामध्ये काहीजण आयुष्याची मजा लुटण्यासाठी पार्टी, उशिरा झोपणं, चुकीचा आहार आणि धुम्रपान अशा गोष्टींच्या आहारी जातात. तर काहीजण भविष्याची तरतूद आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी दिवसरात्र कामात व्यग्र राहणं, ताण घेणं, कामामुळे योग्य वेळी आणि योग्य आहार न घेणं अशा गोष्टींमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

जास्त ताण आणि चुकीची जीवनशैली यामुळे स्वादुपिंडातील हेल्दी म्हणजेच निरोगी पेशी मरू लागतात म्हणजेच कमी होवू लागतात आणि हार्मोनल बॅलेन्सही बिघडतो. परिणामी इन्श्युलि निर्मिती कमी होते आणि रक्तातील साखर न पचल्याने ती रक्तात साचू लागते.

वाढत्या वयासोबत मधुमेहाच्या समस्यांमध्ये वाढ

तसचं जसं जसं वय वाढत जातं स्वादुपिंडातील पेशी आणि स्नायूंवर Muscles परिणाम होवून ते कमी होवू लागतात. त्यामुळे इन्श्युलिन निर्मीती कमी होते. शिवाय वय वाढल्याने शारिरिक हालचाल कमी होते आणि पचनक्रिया मंदावते. यामुळे साखरेच्या चयापचय क्रियेवरही परिणाम होतो. परिणामी वाढत्या वयासोबत मधुमेहाची जोखीम अधिक वाढू लागते.

यासाठीच खास वरुन ३५-४० वयोगटातील व्यक्तींनी मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी आरोग्याची काळजी घेण्यासाठी चांगली जीवनशैली आणि आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

OYO IPO: लवकरच येणार ओयोचा आयपीओ; सेबीकडे पुन्हा कागदपत्र जमा करण्याच्या तयारीत

Virat Kohli on Chris Gayle : RCBमध्ये पुन्हा एकदा एंट्री करणार युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल? विराट कोहलीने दिली ऑफर

Healthy Diet For Kids : मुलांच्या निरोगी वाढीसाठी आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश, मिळतील भरपूर फायदे

SCROLL FOR NEXT