Stroke Level In World
Stroke Level In World  esakal
आरोग्य

Stroke Level In World : वर्ष 2050 पर्यंत एक कोटी लोकांचा स्ट्रोकमुळे होऊ शकतो मृत्यू, रिसर्चचा दावा

साक्षी राऊत

Stress Level In World : एका नव्या रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आलाय की, जगभरात स्ट्रोकमुळे मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या दाव्यानुसार पुढील तीन दशकांत दरवर्षी एका कोटीपेक्षा अधिक लोकांचा स्ट्रोकने मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रिसर्चर्सच्या मते, यावर तातडीने उपाययोजना न केल्यास याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जाईल. याबाबतची माहिती लँसेट न्यूरॉलॉजी जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार, स्ट्रोकमुळे मृत्यूचा आकडा 2020 मध्ये 6.6 मिलियनहून 2050 मध्ये 9.7 मिलियन पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढल्या तीन दशकांत हा आकडा वाढून स्ट्रोकमुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा 86 टक्क्यांहून 91 टक्क्यांवर पोहोचला आहे. रिसर्चर्सच्या मते, मागल्या तीस वर्षांत जागतिक स्तरावर स्ट्रोकने मृत्यूचे प्रमाण जवळपास दुप्पट झाले आहे.

पुढील काळात अशीच स्थिती राहिल्यास येत्या काळात स्ट्रोकमुळे आणि इतर संसर्गाने होणारे मृत्यूचे प्रमाण एक तृतीयांश कमी करण्याचे जागितक आरोग्य संघटनेचे ध्येय पूर्ण होणार नाही. हे ध्येय 2023 ते 2030 पर्यंत पूर्ण करण्यासाठी 140 बिलियन डॉलर रकमेची आवश्यकता आहे. (Health)

स्ट्रोक म्हणजे नक्की काय?

यास मेंदूला येणारा झटका असेही म्हणता येईल. या स्थितीत मेंदूला रक्तपुरवठा होत नाही किंवा मेंदूमधील रक्तवाहिन्या फाटतात. या स्थितीमुळे कायमस्वरूपी अपंगत्व किंवा मृत्यूही होऊ शकतो.

स्ट्रोकची कारणं काय?

हाय ब्लड प्रेशर हे हाय बीपीचे मुख्य कारण मानले जाते. तर मधुमेहाच्या रूग्णांमध्येही स्ट्रोकचा धोका जास्त असतो. याशिवाय हाय कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, आहार, खराब जीवनशैली यामुळेही याचा धोका वाढतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT