youth Trouble with gases cold
youth Trouble with gases cold sakal
आरोग्य

तर काय?

सकाळ वृत्तसेवा

माझे वय २५ वर्षे आहे. गेले ६-७ महिने सतत गॅसेसचा त्रास होतो आहे. गॅसेसला घाण वास नसतो पण लोकांमध्ये जाऊन बसण्याची भीती वाटायला लागलेली आहे. आत्ताच नवीन नोकरी लागलेली आहे. कृपया उपाय सुचवावा.

- पराग अबनावे, मुंबई

उत्तर : रोज पोट नीट साफ झाले नाही की अशा प्रकारचा गॅसेसचा त्रास बऱ्याच लोकांना होताना दिसतो. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा सॅनकूल चूर्ण कोमट पाण्याबरोबर घेणे सुरू करावे. तसेच पचन नीट राहण्याच्या दृष्टीने जेवण्यापूर्वी छोट्या आल्याचा तुकडा सैंधव मीठ लावून चावून खावा. जेवताना शक्यतो कोमट पाणी पिणे सुरू करावे.

चवळी, पावटा, चणे, राजमा, आंबवलेले पदार्थ वगैरे वातूळ गोष्टी आहारातून पूर्णपणे वर्ज्य करणे इष्ट. जेवणानंतर संतुलन अन्नयोग गोळ्या घेणे सुरू करावे. रोज सकाळी २०-२५ मिनिटे चालण्याचीही पचनाला मदत होईल. एवढे करून उपयोग झाला नाही तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, कारण वात अडवण्याने इतर प्रकारचे त्रास होण्याची शक्यता असते.

उन्हाळा सुरू झाला की मला सर्दीचा त्रास सुरू होतो. सकाळी सकाळी शिंका येणे, नाकातून पाणी वाहणे सुरू होते. थंडीच्या दिवसात अशा प्रकारचा त्रास होत नाही, याचे सगळ्यांना आश्र्चर्य वाटते. यावर उपाय सुचवावा.

- लता आभाळकर, नांदेड

उत्तर : पित्त वाढले की अशा प्रकारचा ॲलर्जिक सर्दीचा त्रास बऱ्याच जणांना होताना दिसतो. यासाठी संतुलन प्रवाळपंचामृत, संतुलन पित्तशांतीसारख्या गोळ्या घेण्याचा फायदा होऊ शकेल. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने संतुलनचा आत्मप्राश, सॅनरोझ वगैरे रसायने घेण्याचाही उपयोग होऊ शकेल.

सकाळी एक ग्लास पाण्यात एक चमचा संतुलन सीतोपलादी मिसळावे व दिवसभरात थोडे थोडे हे पाणी संपवावे. यामुळेही शरीरातील ॲलर्जिक त्रास कमी व्हायला मदत मिळेल. रात्री झोपताना नाकात नस्यसॅन घृत घालण्याचाही फायदा मिळू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT