Alia Bhatt open up her secret for her marriage esakal
नुकतीच आलियाने चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे.रणबीर आणि आलिया आई होणार असल्याची ही गोड बातमी ऐकून कुटुंबियांचा देखिल आनंद द्विगुणित झालाय.यावेळी आलियाने एका मुलाखतीत जे सांगितलं ते कळल्यानंतर लग्नानंतर तिचं लगेच आई होण्याचं कारण तुमच्या लक्षात येईल.
बॉक्स ऑफिसवर धमाल गाजवणारा आलियाचा गंगुबाई काठीयावाडी हा चित्रपट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आलियाने तिच्या आई होण्याबाबतची काही मतं त्यावेळी मांडली होती.
१४ एप्रिल रोजी आलिया आणि रणबीर या जोडप्याने लग्नाची गुड न्यूज देत चाहत्यांना खुश केले होते.आणि २८ जूनला या जोडप्याने त्यांच्य़ा बाळाची खुशखबरी देत सर्वांना आणखी एकदा चकित केले आहे. एका मुलाखतीत बोलताना आलिया म्हणाली,"लोकांना मी वयाच्या तीसाव्या वर्षी लग्न करणे अपेक्षित होते.पण त्याआधीच लग्न करून मी लोकांना चकीत केले होते.पण त्यामागचं खरं कारण सांगायचं झालं तर मला असं वाटतं की, की जेव्हा मी जबाबदारी घेण्यास तत्पर आहे असं मला वाटेल तेव्हा मला लग्न करायचं होतं."
पुढे ती म्हणते,"मला कायम असं वाटायचं माझा लग्नाचा निर्णय हा तेव्हा ठाम असेल जेव्हा मी आई होण्याची जबाबदारी घेऊ शकेल.म्हणून जेव्हा माझी आई होण्याची ठाम तयारी असेल तेव्हाच लग्न करेल."
त्यामुळे मला असे वाटताच मी आणि रणबीरने लग्न करण्याचा निर्णय घेतला.नुकताच या जोडप्याने एक सुंदर फोटो टाकत त्याच्या बाळाची गोड बातमी दिली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.