Eknath Shinde - Devendra Fadnavis
Eknath Shinde - Devendra Fadnavis Sakal
फोटोग्राफी

Photo: शिंदे सरकार विधानसभेत टिकणार? उद्या बहुमत चाचणी, बैठकांना उधाण

सकाळ डिजिटल टीम

आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली असून भाजपच्या राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान नव्या सरकारला उद्या बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या बैठकांना उधाण आलं आहे.

उद्या बहुमत चाचणी होणार असून भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली. शिंदे सरकारला उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या उद्या दुसऱ्या दिवशी शिवसेना-भाजप युती सरकारला बहुमताच्या चाचणीला सामोरे जायचे आहे. यावेळी नक्की सरकारची रणनीती काय असेल यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
बहुमत चाचणीसाठी मतदान करण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. यावेळी शिवसेनेचे बंड केलेले आणि भाजपचे सर्व आमदार उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.
भाजपबरोबर राष्ट्रवादीचीही बैठक पार पडली आहे. त्यामध्ये शरद पवारांनी मध्यावधी निवडणुकासाठी तयार राहा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT