Himachal Pradesh Temperature updates
हिमाचल प्रदेशात गेल्या चोवीस तासांत थंडीची लाट तीव्र झाल्यामुळे, लाहौल-स्पिती जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र केलॉन्ग येथे राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली - 6.9 अंश सेल्सिअस, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली. दरम्यान, किन्नौर जिल्ह्यातील सतलुज नदीजवळील कल्पा या छोट्या गावात -4.7 अंश सेल्सिअस तर मनालीमध्ये -0.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. डलहौसीमध्ये -2.0 अंश सेल्सिअस, कुफरीमध्ये -3.2 आणि शिमलामध्ये -0.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.राज्यात हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बर्फवृष्टीमुळे दोन राष्ट्रीय महामार्गांसह 147 रस्ते वाहतुकीसाठी ठप्प झाले आहेत. किन्नौरमधील एक राष्ट्रीय महामार्ग भूस्खलनामुळे बंद झाला आहे. लाहौल-स्पीतीमध्ये सर्वाधिक 108 आणि मंडीमध्ये 24 रस्ते अडवले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (SDMA) एका निवेदनात म्हटले आहे की, तब्बल 34 पाणीपुरवठा योजनांनाही फटका बसला आहे.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.